Thane Mayor Meenakshi Shinde : ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम, कारण नेमकं काय?
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिंदेच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. निष्ठावान शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांच्या हकालपट्टीमुळे त्या नाराज होत्या. ही पक्षांतर्गत नाराजी असून, कार्यकर्त्यांच्या उमेदवारीच्या इच्छेचा आदर व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्या पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे जवळचे आणि निष्ठावान कार्यकर्ते मानले जाणारे शिवसेना शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला. विक्रांत वायचळ यांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्थानिक नगरसेवकाला उमेदवारी मिळावी यासाठी मोहीम सुरू केली होती. त्यांनी भूषण पाटील आणि मधुकर पावशे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. ही कृती पक्षविरोधी मानत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत असताना, मीनाक्षी शिंदे यांच्यासारख्या निष्ठावान नेत्याचा राजीनामा हा पक्षासाठी धक्का मानला जात आहे. ठाण्यात ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांदरम्यान हा राजकीय घडामोड घडली आहे. मीनाक्षी शिंदे यांनी ही घरातली भांडणं असून, लवकरच पक्षश्रेष्ठींशी बोलून भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स

