हृदयविकाराच्या झटक्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

Namrata Patil

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला आहे. एएसआय (ASI) प्रकाश कंकाळ आणि एएसआय (ASI) वसंता काळदाते अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही पोलिसांच्या निधनाने संपूर्ण गावावर तसेच पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय (ASI) प्रकाश कंकाळ यांना […]

हृदयविकाराच्या झटक्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

Follow us on

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला आहे. एएसआय (ASI) प्रकाश कंकाळ आणि एएसआय (ASI) वसंता काळदाते अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही पोलिसांच्या निधनाने संपूर्ण गावावर तसेच पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय (ASI) प्रकाश कंकाळ यांना काल रविवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याचदरम्यान लोणार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय (ASI) वसंता काळदाते यांनीही काल हृदयविकाराचा झटका आला. या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला.

यातील कंकाळ या पोलीस अधिकाऱ्यांवर सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन, तर काळदाते या पोलीस अधिकाऱ्यांवर मेहकरजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दोन्ही पोलिसांच्या निधनाने संपूर्ण गावावर तसेच पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. तसेच या पोलीस अधिकाऱ्यांच्या निधनामुळे बुलडाणा पोलीस दलाची हानी झाल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI