200 ते 250 पदाधिकारी… मोठा लवाजमा …. निष्ठावंताचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का.. . थेट भाजपात प्रवेश
Uddhav Thackeray Shivsena: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपने मोठा डाव साधला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Uddhav Thackeray Shivsena: वाशिमचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आज मुंबईत समर्थकांसह पक्ष प्रवेश केला. त्यांनी 29 वाहनांच्या ताफ्यासह मुंबई गाठली. त्यांचे अनेक समर्थक यावेळी उपस्थित होते. मापारी यांना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत मोठा निर्णय घेतला. सुरेश मापारी यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी करण्यात आली होती नियुक्ती करण्यात आल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन दाखवले.
200-250 पदाधिकाऱ्यांसह पक्ष प्रवेश
सुरेश मापारी हे माजी जिल्हा परिषद सदस्य,अर्थ आणि बांधकाम सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहीलेले आहेत. पण अचानक त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून दूर केल्याने त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच हा मोठा पक्ष प्रवेश मानला जात आहे.
मापारी हे काल रात्री 200 ते 250 पदाधिकारी, सरपंच,आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले होते. 29 वाहनांचा मोठा ताफा घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पालिकेतील समीकरणंही पालटली आहे. जिल्ह्यात हा मोठा दे धक्का मानल्या जात आहे.
सुरेश मापारी यांचं ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असल्यानं आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. ते खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वीही मापारी हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आज त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. याठिकाणी भाजपचे बळ वाढल्याचे म्हटले जात आहे.
सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील दिग्गज नेते मानले जातात. याआधी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशा अनेक महत्त्वाच्या पदाची जबाबदारी त्यांनी संभाळली आहे. वाशिमच्या ग्रामीण भागात कार्यकर्ते आणि मतदारांचे मोठे जाळे त्यांच्या पाठीशी उबे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानल्या जात आहे.