AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅप्पी बर्थ डे टू यू… अमित ठाकरे यांचा वाढदिवस… शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर… त्या केकची का मोठी चर्चा

Aditya Thackeray wish Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी उद्धव सेनेचे नेते आणि बंधू आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर हजरे लावली. त्यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काय म्हणाले आदित्य ठाकरे?

हॅप्पी बर्थ डे टू यू... अमित ठाकरे यांचा वाढदिवस... शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर... त्या केकची का मोठी चर्चा
अमित ठाकरे -आदित्य ठाकरे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 24, 2026 | 12:28 PM
Share

Amit Thackeray Birthday: मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे शिवतीर्थावर हजर झाले. त्यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकाच फ्रेममध्ये दिसले. मनसे आणि उद्धव सेना गेल्यावर्षी मे महिन्यापासून मराठीच्या मुद्यावर एकत्रित आली आहे. त्यानंतर अनेक कौटुंबिक सोहळ्यात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकत्र दिसले. आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा एकत्रित दिसत आहेत.

दोन्ही भावातील बाँडिंग समोर

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही भावातील बाँडिंग समोर आले. आदित्य ठाकरे हे अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर आले. त्यांनी येताच अमित ठाकरे यांना कडाडून मिठी मारली. त्यांना वाढिदवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी भलामोठा पुष्पगुच्छही सोबत आणला होता. दोन्ही भावांची ही भेट होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि घोषणा दिल्या. महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही भाऊ एकत्र दिसले. या वेळी अमित ठाकरे यांच्या कुटुंबियांची उपस्थिती दिसून आली.

त्या केकची का होत आहे चर्चा?

अमित ठाकरे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी केक आणला. त्या केकची मोठी चर्चा होत आहे. या वाढदिवसाच्या केकवर एक खास संदेश लिहिण्यात आला होता. NEET प्रश्नपत्रिका फुटीने देशात संतापाची लाट उसळली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नीट परीक्षेतील या गडबडीविरोधात समाज माध्यमावर भलीमोठी पोस्ट लिहित सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तर अमित ठाकरे यांनी सुद्धा याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान अमित ठाकरे यांच्यासाठी आणलेल्या केकवर नीट हटवा, देश वाचवा असा मजकूर लिहिलेला होता. हा केक अमित ठाकरे यांनी कापला. यावेळी अमित ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. ज्युनिअर ठाकरे यांच्या भेटीनं कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.

पालिका निवडणुकीनंतर पहिली भेट

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ज्युनिअर ठाकरेंमध्ये वाढदिवसानिमित्त पुन्हा भेट झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. अमित ठाकरे यांना शुभेच्छा देऊन आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेतील. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा होत असल्याचे समजते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ