भर उन्हाळ्यात नागपुरात गारांसह पावसाच्या धारा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नागपूर: भर उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागपुरात आज अचानक पावसाची हजेरी लावली. नागपूरच्या ग्रामीण भागात गारांसह पावसाच्या धारा पाहायला मिळाल्या. नागपूर जिल्यातील ग्रामीण भागात गारांसह पाऊस कोसळला. तारसा,चाचेर, खापरखेडा,सावनेर या भागात अचानक पाऊस कोसळला. याशिवाय मौदा, पारशिवणी, सावनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, संत्रा […]

भर उन्हाळ्यात नागपुरात गारांसह पावसाच्या धारा
Follow us on

नागपूर: भर उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागपुरात आज अचानक पावसाची हजेरी लावली. नागपूरच्या ग्रामीण भागात गारांसह पावसाच्या धारा पाहायला मिळाल्या. नागपूर जिल्यातील ग्रामीण भागात गारांसह पाऊस कोसळला. तारसा,चाचेर, खापरखेडा,सावनेर या भागात अचानक पाऊस कोसळला. याशिवाय मौदा, पारशिवणी, सावनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.

काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, संत्रा आणि आंबा पिकांना या गारपीट आणि पावसाचा मोठा फटका बसू शकतो. हवामान विभागाने येत्या 24 तासात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

VIDEO: