UPSC Revised Timetable | यूपीएससी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

| Updated on: Jun 05, 2020 | 5:45 PM

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि आयएफएसच्या पूर्वपरीक्षा आता रविवार 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येतील. UPSC Revised Timetable

UPSC Revised Timetable | यूपीएससी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा आणि मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले. यानुसार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Civil Services) आणि भारतीय वन सेवा- आयएफएसच्या (Indian Forest Service) पूर्वपरीक्षा (Preliminary examinations) आता रविवार 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येतील. यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. (UPSC Revised Timetable)

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा (UPSC Civil Services – Mains) 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहेत. तर आयएफएसची मुख्य परीक्षा (Indian Forest Service Mains) 28 फेब्रुवारी 2021 रोजी होईल.

एनडीए आणि एनए परीक्षा (I) तसेच एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2020, या दोन्हीसाठी 6 सप्टेंबर 2020 रोजी एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल.

2019 च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षांसाठी यूपीएससी व्यक्तिमत्व चाचणी (UPSC Personality Tests) 20 जुलै 2020 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आयोगाकडून उमेदवारांना स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल.

“गेल्या दोन महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या विविध परीक्षा व मुलाखतींबाबत उमेदवारांना स्पष्टता देण्याच्या दृष्टीने 5 जून, 2020 रोजी होणाऱ्या बैठकीत आयोग पुढील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करेल” असे एका परिपत्रकात यूपीएससीने म्हटले होते.

(UPSC Revised Timetable)