AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुस्तान घर में घुसेगा भी, और मारेगा भी, ‘उरी’चा ट्रेलर लॉन्च

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सर्जिकल स्ट्रईकचा थरार बघायला मिळतो. तर “हिंदुस्तान अब चूप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी!” परेश रावल यांच्या आवाजातील हा डायलॉग कानावर पडताच अंगावर काटा उभा […]

हिंदुस्तान घर में घुसेगा भी, और मारेगा भी, ‘उरी’चा ट्रेलर लॉन्च
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सर्जिकल स्ट्रईकचा थरार बघायला मिळतो. तर “हिंदुस्तान अब चूप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी!” परेश रावल यांच्या आवाजातील हा डायलॉग कानावर पडताच अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेता परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत, तर यात एका सीनमध्ये देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर देखील दिसत आहेत. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशल याचा अभिनय जबरदस्त असणार आहे, असे ट्रेलरवरुन दिसत आहे. या चित्रपटात लष्कराच्या अधिकाऱ्याची भूमिका तो निभावत आहे. ट्रेलरमध्ये विकी कौशल हा एका वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे, हा लूक त्याच्या इतर चित्रपटांतील भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. यात विकी कौशल जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर चित्रपटातील सनी देओलची आठवण करवून देतो. तसेच यातील अभिनेता परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम यांची भूमिकाही महत्वाची आहे. भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं. गेल्या 29 सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा प्रेक्षकांना होती.  

Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र