
वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. ढोबळमानाने तुमच्या घराची रचना कशी असावी हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. सोबतच तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या नसाव्यात, वस्तूंची योग्य दिशा कोणती? याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे.
मात्र अनेकदा असं होतं की आयुष्यात आपण खूप कष्ट करतो, प्रचंड मेहनत करतो पण त्या कष्टाला यश येत नाही. आपल्या हातात पैसा तर खूप येतो पण तो टिकत नाही. घरात काही कारण नसताना छोट्या -छोट्या गोष्टींवरून मोठ-मोठे वाद होतात. वास्तुशास्त्रानुसार घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतात, तेव्हा या प्रकारच्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. तो दूर करण्यासाठी देखील वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपयाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवता मानली जाते, ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते, त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. त्यामुळे स्वयंपाक घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी असं वास्तुशास्त्रा सांगतं, ज्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. घरावर आर्थिक अडचणी येत नाहीत. तसेच अन्न देखील कधी कमी पडत नाही. त्यामुळे स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी, तिची रोजी पूजा करावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
त्याचबरोबर तुमच्या घराची उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते, त्यामुळे तुमच्या घराच्या उत्तरेला कुबेराची मूर्ती असावी असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कुबेर ही धनाची देवता असते. जर तुमच्या घराच्या उत्तरेला कुबेराची मूर्ती असेल तर ते शुभ मानलं जातं. त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)