हुंड्याची तक्रार केल्याने वैदू समाजाचा महिलेवर बहिष्कार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

जालना : सासरच्या लोकांचा तसेच वैदू जातपंचायतीचा सन्मान न करता सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार केल्याने जातपंचायतीने विवाहितेसह तिच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. भोकरदन तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. वैदू समाजाच्या जात पंचायतीने हा निर्णय घेतला असून जात पंचायतीच्या निर्णयानंतर पीडित महिलेला नातेवाईकांच्या लग्नातून देखील हाकलून दिल्याचं समोर आलं आहे. 22 जानेवारी रोजी पुण्यातील जेजुरी […]

हुंड्याची तक्रार केल्याने वैदू समाजाचा महिलेवर बहिष्कार
Follow us on

जालना : सासरच्या लोकांचा तसेच वैदू जातपंचायतीचा सन्मान न करता सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार केल्याने जातपंचायतीने विवाहितेसह तिच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. भोकरदन तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. वैदू समाजाच्या जात पंचायतीने हा निर्णय घेतला असून जात पंचायतीच्या निर्णयानंतर पीडित महिलेला नातेवाईकांच्या लग्नातून देखील हाकलून दिल्याचं समोर आलं आहे. 22 जानेवारी रोजी पुण्यातील जेजुरी येथे वैदू समाजाच्या जातपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोनाली शिवरकर असं बहिष्कार टाकण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

भोकरदन तालुक्यातील राजूर येथे राहणारी सोनाली पंढरीनाथ शिवरकर (वय 28) या वैदू समाजाच्या आहेत. त्या आपल्या कुटूंबासोबत राहतात. सोनाली यांचे 6 नोव्हेंबर 2009 रोजी समाजातीलच ज्ञानेश्वर अन्ना राजे यांच्याशी लग्न झाले. ते बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे राहातात.

लग्नानंतर दोन महिन्यांनंतरच तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा नवरा ज्ञानेश्वर, सासू दुर्गाबाई, भासरा संभाजी, दीर कैलास, मोठी जाऊ गंगू, लहान जाऊ जानकी हे सोनालीचा छळ करु लागले. आई-वडीलांकडून बाईक घेण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये अशी मागणी त्यांच्याकडे करु लागले. त्यासाठी त्यांना मारहाणही करण्यात आली, कित्येक दिवस उपाशी ठेवण्यात आले. अखेर या सर्व जाचाला कंटाळून त्यांनी याची तक्रार घरच्यांकडे केली.

त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी सासरच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्यानंतर सोनाली यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. यावरुन सासरच्या सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.