VAYU CYCLONE LIVE : ‘वायू’ने दिशा बदलली, महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी

| Updated on: Jun 13, 2019 | 8:26 AM

आज ताशी 200 ते 250 किमी वेगाने हे वादळ कोकण किनारपट्टीहून पुढे गुजरातकडे धडकणार आहे. आज (13 जून) दुपारच्या सुमारास गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीवर वायू वादळ धडकेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

VAYU CYCLONE LIVE : वायूने दिशा बदलली, महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी
Follow us on

गांधीनगर (गुजरात) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाचा फटका काल मुंबईसह महाराष्ट्र किनारपट्टीवर बसला होता. त्यानंतर आज (13 जून) ताशी 250 किमी वेगाने हे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. आज (13 जून) दुपारच्या सुमारास गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीवर वायू वादळ धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ येण्यापूर्वीचं गुजरातच्या काही भागात जोरदार वारे वाहण्यास  सुरुवात झाली आहे. शिवाय अनेक ठिकाणी जोरदार पावसालाही सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातही ‘वायू’चा फटका

वायू चक्रीवादळामुळे काल (12 जून)  मुंबईसह ठाणे, पालघर, या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान काल वायू वादळामुळे मुंबईच्या चर्चगेट परिसरात होर्डिंग अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माधव आप्पा नार्वेकर (62) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी झाडांचीही पडझड पाहायला मिळाली. त्याशिवाय आजही वायू चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी दुपारच्या सुमारास लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्याजवळील घरांना आणि कच्च्या बाधंकामांनाही यामुळे धोका आहे. अशी बांधकामं पडू शकतात, विजेचे खाबं उखडून ताराही गळून पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनेक पर्यटक अलिबागसह रायगड आणि कोकणातील विविध समुद्र किनारी पर्यटनाला गेलेली असून त्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मच्छिमारांनाही दोन दिवस मासेमारी न करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

LIVE UPDATE

[svt-event title=” मुंबईवर ‘वायू’चा धोका टळला, वादळ अरबी समुद्रातच घोंघावत राहणार” date=”13/06/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] मुंबईवर ‘वायू’चा धोका टळला असून हे वादळ अरबी समुद्रातच घोंघावत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”गुजरातमध्ये किनारपट्टी भागातून 2 लाखापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर” date=”13/06/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] गुजरातमध्ये किनारपट्टी भागातून 2 लाखापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर, वायू वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा निर्णय, गुजरातच्या किनारपट्टी भागातून 2 लाख लोकांचे स्थलांतर [/svt-event]

[svt-event title=”वायू वादळामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू” date=”13/06/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] वायू वादळामुळे काल मुंबईत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर गुजरातमध्ये आतापर्यंत वादळी वाऱ्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=” वायू वादळाने दिशा बदलली, वेरावलऐवजी पोरबंदर किनाऱ्यावर वादळ धडकणार” date=”13/06/2019,7:57AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”वादळी वाऱ्यामुळे गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे छप्पर उडाले” date=”13/06/2019,7:55AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”गुजरातमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता, दुपारपर्यत वाऱ्याचा वेग वाढणार” date=”13/06/2019,7:53AM” class=”svt-cd-green” ] वायू चक्रीवादळामुळे 70 पेक्षा जास्त रेल्वेगाड्या रद्द, तर 28 रेल्वे गुजरातच्या अमरेली, गीर सोमनाथ, दीव, जुनाग्रह, पोरबंदर, राजकोट, जामनगर, देवभूमी, द्वारका आणि कच्छ या ठिकाणी वादळाचा जास्त फटका, ताशी 155 ते 165 वेगाने गुजरातमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता, दुपारपर्यत वाऱ्याचा वेग वाढणार

[svt-event title=”वायू चक्रीवादळामुळे 70 पेक्षा जास्त रेल्वेगाड्या रद्द” date=”13/06/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जवळपास 100 पेक्षा जास्त रेल्वेगाड्या रद्द” date=”13/06/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज्यात सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सज्ज, किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या 52 पेक्षा जास्त टीम तैनात” date=”13/06/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”गुजरातमध्ये सतर्कतेचा इशारा ” date=”13/06/2019,7:40AM” class=”svt-cd-green” ]