फी न भरल्याने ऑनलाईन निकाल नाही, TISS च्या मनमानीवर विद्यार्थी नाराज

| Updated on: Jul 20, 2020 | 8:41 AM

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेने (TISS) फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन (Vidyarthi Bharati Prohibition Tiss) दाखवण्यास नकार दिला.

फी न भरल्याने ऑनलाईन निकाल नाही, TISS च्या मनमानीवर विद्यार्थी नाराज
Follow us on

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेने (TISS) फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन (Vidyarthi Bharati Prohibition Tiss) दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली असून आणि विद्यार्थी संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली (Vidyarthi Bharati Prohibition Tiss) आहे.

“टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या मॅनेजमेंटचे डोके ठिकाणावर आहे का ? असा खोचक प्रश्न विद्यार्थी भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी टिसच्या मॅनेजमेंटला विचारला आहे. फी न भरल्यामुळे ऑनलाईन निकालच दाखवले नाहीत यास अमानुष म्हणून त्यांचा धिक्कार केला आहे आणि मॅनेजमेंटला पैसा पिपासू म्हंटले आहे.”

“TISS प्रशासन इबीसी, ओबीसी मुलांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे हे विद्यार्थी भारती सहन करणार नाही”, असं विद्यार्थी भारतीचे राष्ट्रीय प्रवक्ता रत्नदीप यांनी सांगितले. रत्नदीप हे TISS मध्ये शिकत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“विद्यार्थ्यांवर जगावं की मरावं अशी परिस्थिती आलेली असताना TISS मध्ये चार ते सहा तासांचे ऑनलाईन लेक्चर सुरू करणार आहेत. हे लेक्चर अटेंड करणं मुलांना शक्य नाही. विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा चांगल्या क्वालिटीचे फोनही नाहीत. त्यात रिचार्ज आणि नेटवर्क प्रॉब्लेम तर आहेत. बरेच विद्यार्थ्यांच्या घरात पावसामुळे पाणी भरलेलं आहे म्हणून बसण्याची सोय नाही, वीज नाही अशा विद्यार्थ्यांनी कसे लेक्चर अटेंड करावे ? या संदर्भात विद्यार्थी भारतीकडून TISS ला 15 जुलै 2020 ला पत्र देखील पाठवले”, असे विद्यार्थी भारती राष्ट्रीय संघटक शुभम राऊत यांनी सांगितले.

“जो पर्यंत विद्यार्थी फी भरत नाही तोपर्यंत त्याचे निकाल कळवले जात नाही. 15 ते 23 जुलैपर्यंत पुनर्मूल्यांकनचे फॉर्म भरले जाणार असल्याची नोटीस आहे. आता विद्यार्थ्यांना कळलंच नाही की आपण पास आहोत की फेल आहोत ? त्याशिवाय विद्यार्थी पुनर्मूल्यांकन फॉर्म कसे भरतील? किंवा जर या काळात त्यांची फी भरण्याची परिस्थितीच नसेल तर त्यांनी या संभ्रमात किती काळ जगावं”, असा प्रश्न विद्यार्थी भारती उपाध्यक्ष अर्जुन बनसोडे यांनी मांडला.

“या सर्व कारणांमुळे TISS चे अनेक विद्यार्थी नैराश्येत आहेत आणि अनेक विद्यार्थी हा वर्ष आपण गॅप घेऊया या मानसिकतेपर्यंत देखील पोहोचले आहेत. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण?”, असा सवाल राष्ट्रीय सचिव जितेश पाटील यांनी केला.

“विद्यार्थी भारती TISS ला चेतावनी देते की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या फी ची सक्ती न करता त्यांचे निकाल कळवले जावेत. अन्यथा विद्यार्थी भारती आक्रमक भूमिका घेत TISS ला भिकारी पुरस्काराने सन्मानित करेल”, असे मत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी मांडले आहे.

संबंधित बातम्या :

सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, विद्यार्थी संघटनेची मागणी

SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात….