सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, विद्यार्थी संघटनेची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांमुळे सरासरी गुण देऊन पदवीच्या (University exam Final year result) अंतिम वर्षाचा निकाल लावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, विद्यार्थी संघटनेची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांमुळे सरासरी गुण देऊन पदवीच्या (University exam Final year result) अंतिम वर्षाचा निकाल लावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे. पदवीच्या परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्यात येतात. मात्र कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेक परीक्षाही रखडल्या आहेत. (University exam Final year result)

“कोरोनाचा कहर लवकर आटोक्यात येण्याची श्यक्यता नाही. यामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल देण्यात यावा”, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन अर्थात मासू या संघटनेच्या वतीने अॅड सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे. अॅड इंगळे यांनी याबाबतचं सविस्तर निवेदन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवलं आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिल मे महिन्यात होत असतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्ग असल्याने कोणत्याच परीक्षा झालेल्या नाहीत. कोरोना लवकर आटोक्यात येण्याची शक्यता नाही, त्यामुळे आता यूजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद कलम 5 नुसार तशी तरतूद आहे. याचा वापर करून निकाल देण्यात यावेत. तसं झाल्यास विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाचण्याची शक्यता आहे, असं मासूचे अध्यक्ष अॅड सिद्धार्थ इंगळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

शाळांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

एकीकडे विद्यापीठ परीक्षा रखडल्या असताना, दुसरीकडे शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने त्याबाबत नियोजन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ‘कोरोना’ संकटामुळे शाळा प्रत्यक्ष उघडता आल्या नाहीत, तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्यासाठी प्रणाली विकसित करावी लागेल, त्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला.”महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट मला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही”, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

(University exam Final year result)

संबंधित बातम्या  

शाळा उघडल्या नाहीत, तर डिजिटल क्लासरुमचे नियोजन करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना 

कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं, जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार : मुख्यमंत्री

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *