पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी 

| Updated on: Sep 24, 2020 | 8:23 AM

विजय देशमुख यांची पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Vijay Deshmukh appointed as Additional Collector of Pune)

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी 
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा अखेर सुटला आहे.  विजय देशमुख यांची पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजय देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचं बोललं जातं आहे. बुधवारी (23 सप्टेंबर) रात्री उशिरा त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. (Vijay Deshmukh appointed as Additional Collector of Pune)

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी कोण येणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती. या पदासाठी अनेक अधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डींगही लावली होती. यात सिडकोतील ठाणे विभागाचे अतिरिक्त भूमी व भूमीपण अधिकारी अजिंक्य पडवळ, अजित पवारांच्या मर्जीतील विजय देशमुख, पुण्यातील माजी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे ही नाव चर्चेत होती. यातील अजिंक्य पडवळ हे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मर्जीतील मानले जातात. त्यामुळे या पदावर नेमकं कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र अखेर विजय देशमुख यांची पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख यांना पुणे जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी देखील त्यांनी या पदावर काम पाहिले आहे. मात्र काही न्यायालयीन प्रक्रियमुळे त्यांना या पदावर राहता आले नव्हते. विजय देशमुख हे सध्या पुण्यात कुळकायदा शाखेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाच्या चर्चांना वेग आला होता. साहेबराव गायकवाड यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर अखेरीस विजय देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. (Vijay Deshmukh appointed as Additional Collector of Pune)

संबंधित बातम्या :

Pune Collector | पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी

यवतमाळचा ‘शेतकरीमित्र’ ते साताऱ्यातील दुष्काळमुक्ती; पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची धडाकेबाज कारकीर्द