एसटीच्या संपावरून लक्ष हटवण्यासाठी हिंसाचार घडवला- प्रवीण दरेकर

| Updated on: Nov 13, 2021 | 5:52 PM

राज्यात एसटी कामगारांचा बंद सुरू आहे.  सरकारने अपयश झाकण्यासाठी व एसटी बंद वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर करून वातावरण गढूळ केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

एसटीच्या संपावरून लक्ष हटवण्यासाठी हिंसाचार घडवला- प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
Follow us on

पुणे- अमरावती जिल्ह्यात आज भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारात भाजपचे कार्यकर्ते नव्हते. जनता स्वस्फूर्तीने या बंदमध्ये उतरली असून, या बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते ही सहभागी झाले होते,असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

 नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर

राज्यात एसटी कामगारांचा बंद सुरू आहे.  सरकारने अपयश झाकण्यासाठी व एसटी बंद वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर करून वातावरण गढूळ केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळावर प्रवीण दरेकर व माजी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

सत्तेत आल्यावर शिवसेनेची भूमिका बदलली
बाळासाहेब ठाकरेंना लोकांनी हिंदू हृदयसम्राट अशी पदवी दिली होती. त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर त्यांच्याही भूमिका बदलल्या , तेही त्यांच्या सारखेच वागायला लागल्याची टीका त्यांनी केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र शिवसेना- भाजपचा पाचवर्षे सरकार होते. तेव्हा कुठं दंगली झाल्या नाहीत. कुठंही जातीय तेढ निर्माण झाली नाही. पण जेव्हा- जेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार आले, तेव्हा हिंदू-मुस्लिम दंगली झाल्याचा आरोप करत दरेकरांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

यापूर्वी भाजपाचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी अमरावती हिंसाचारा मागे महाविकास आघाडी सरकारचे कटकारस्थान असल्याचे विधान केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हि आता राज्य सरकार वरती निशाना साधला आहे. भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबारही करावा लागला.

हेही वाचा

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

Video : कोव्हिड काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास, किरीट सोमय्यांचं ठाकरेंच्या दुखण्यावर बोट

मालेगावमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, पोलीस अधीक्षकांची माहिती; आमदारांकडून सूत्रधाराच्या अटकेची मागणी