वाशिममध्ये कोरोनाचा शिरकाव, रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह

| Updated on: Apr 18, 2020 | 8:54 PM

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित (Washim Corona Patient) रुग्णाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

वाशिममध्ये कोरोनाचा शिरकाव, रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Follow us on

वाशिम : महाराष्ट्राला कोरोनाने विळखा घातला (Washim Corona Patient) आहे. या कोरोना विरोधातील लढाईत वाशीम जिल्हा बाजी मारु पाहत असताना पुन्हा एकदा माशी शिंकली आहे. मेडशी येथे 3 एप्रिलला जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल दुसऱ्या तपासणीत निगेटिव्ह आला होता. मात्र या रुग्णाचा तिसरा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रीन झोन ठरलेल्या वाशिम जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव घेतला आहे.

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित (Washim Corona Patient) रुग्णाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर त्याची स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा 24 तासांनी म्हणजे 17 एप्रिलला तिसरा नमुना मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णाचा रुग्णालयातील मुक्काम पाच दिवसांनी वाढवण्यात आला आहे.

यानंतर त्या रुग्णाचे पुन्हा दोन चाचण्या घेण्यात येणार आहे. या दोन्ही चाचण्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला तर त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा पाच दिवसानंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे.

त्यामुळे ग्रिन झोनच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या असलेल्या वाशिम जिल्ह्याला पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत मात्र काही प्रमाणात वाढ झाली (Washim Corona Patient) आहे.