पतीने अश्लील मेसेज केला, पिंपरीत महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं

पतीने अश्लील मेसेज केला, पिंपरीत महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं

पिंपरी चिंचवड : पतीने अश्लील मेसेज केल्याचा आरोप करत पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. हा मेसेज पाहून संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पिंपरी चिचंवडमधील ही घटना आहे. या प्रकारच्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

पिंपरीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पिंपरी पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या 38 वर्षीय पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

30 डिसेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपी पतीने आपल्या पत्नीला अश्लील एसएमएस पाठवत तिच्या मनात लज्जा उत्पन्न करत तिचा विनयभंग केला. हे दोघे गेल्या पाच महिन्यांपासून विभक्त राहत असून पीडित महिलेचा पती हा नाशिक येथे कामानिमित्ताने बाहेर असता गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये कौटुंबीक कलह होत होता.

त्यानुसार दोघेही विभक्त राहत होते. परंतु पीडित महिलेचा पती हा तिला रोज अश्लील मेसेज पाठवत होता. गेल्या महिन्यात पीडित महिलेचा पतीने अतिशय अश्लील, असे संदेश पीडित पाहिलेला पाठवले यानुसार त्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात आपल्या पती विरुद्ध अश्लील संदेश पाठवल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI