AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

John Cena pays tribute to Sushant | सुशांतला श्रद्धांजली, जॉन सीनाची पोस्ट व्हायरल

जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर सुशांत सिंह राजपूतचा फोटो शेअर केला आहे. (John Cena pays tribute to Sushant Singh Rajput)

John Cena pays tribute to Sushant | सुशांतला श्रद्धांजली, जॉन सीनाची पोस्ट व्हायरल
john cena pays tribute Sushant singh Rajput
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 16, 2020 | 12:42 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. आता WWE सुपरस्टार जॉन सीनानेही (John Cena) सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे. जॉन सीनाने सुशांतच्या निधनावर दु:ख व्यक्त करत, त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर हा फोटो शेअर केला आहे. मात्र जॉनने कोणतीही कॅप्शन किंवा प्रतिक्रिया लिहिलेली नाही. (John Cena pays tribute to Sushant Singh Rajput)

जॉन सीनाची ही पोस्ट सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेत आहे. जॉन सीनाच्या फॅन्ससह बॉलिवूड आणि सुशांत सिंह राजपूतचे चाहते ही पोस्ट शेअर करत आहेत. या पोस्टसोबत त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

View this post on Instagram

A post shared by John Cena (@johncena) on

सुशांत सिंह राजपूतने रविवारी मुंबईतील आपल्या घरी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सुशांतच्या आत्महत्येने बॉलिवूडसह देश हादरुन गेला होता. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याने आत्महत्या का केली याची कारणं आता पोलीस शोधत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या चारच दिवसांपूर्वी त्याच्या माजी मॅनेजरनेही आत्महत्या केली होती.

सुशांतच्या वहिनीचंही निधन

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आणखी एक आघात झाला आहे. सुशांतच्या चुलत वहिनी सुधादेवी यांचेही निधन झाले. सुशांतच्या निधनाचा मोठा धक्का बसल्याने सुधादेवी यांचे देहावसान झाल्याचे बोलले जाते.

सुधादेवी या सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्रसिंह याच्या पत्नी. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र सुशांतच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून सुधादेवी यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांची शुद्ध सारखी हरपत होती.

(John Cena pays tribute to Sushant Singh Rajput)

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Sushant Singh Rajput | इकडे सुशांतवर अंत्यसंस्कार, तिकडे वहिनीनेही प्राण सोडले, राजपूत कुटुंबावर पुन्हा आघात

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?