वजन कमी करण्यासाठी खा ‘हे’ 5 प्रकारचे चाट, चवीलाही अप्रतिम

बदलत्या खाणपिण्याच्या सवयींमुळे अनेकांचे वजन वाढत चालेले आहे. अशातच वाढते वजन कमी करण्यासाठी बहुतेकजण खुप कंटाळा करतात. कारण त्यांना असे वाटते की त्यांना फक्त उकडलेले पदार्थ तसेच मोजकेच पदार्थ खावे लागतील, परंतु असे अनेक पदार्थ आहेत जे केवळ वजन नियंत्रित करण्यास मदत करत नाहीत तर चवीने परिपूर्ण देखील आहेत. या लेखात आपण अशा 5 चाटबद्दल जाणून घेऊ जे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी खा हे 5 प्रकारचे चाट, चवीलाही अप्रतिम
फाईल फोटो
Updated on: May 11, 2025 | 3:18 PM

आजकाल प्रत्येकजण हा वाढत्या वजनाने हैराण आहे. वजन कमी करण्यासाठी बहुतेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. कारण वाढत्या वजनावर वेळेत आटोक्यात आणले पाहिजे. कारण तुम्ही जर वेळेत लक्ष दिले तर सुरुवातीला वजन कमी करणे सोपे होते आणि आजार होण्याची शक्यता देखील कमी होते. तथापि, जर वाढत्या वजनाकडे लक्ष दिले नाही तर ते लठ्ठपणात बदलते. या परिस्थितीत वजन कमी करणे कठीण तर होतेच पण मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. जेव्हा वजन नियंत्रणाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वप्रथम संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करावे लागते, परंतु लोकांना वाटते की यामुळे डाएट पदार्थांचे सेवन करावे लागते. पण आता असे होणार नाही. कारण अशा अनेक रेसिपी आहेत ज्या आरोग्यदायी तसेच चविष्ट आहेत आणि तुम्ही बिनधास्त या पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

वजन कमी करताना सर्वात मोठी समस्या म्हणजे जेवणाच्या मधल्या गरजांवर नियंत्रण ठेवणे. अशा परिस्थितीत लोकांचा संयम सुटतो आणि ते अनहेल्दी स्नॅक्स खातात. यामुळे संपूर्ण वजन कमी करण्याचा प्रवास बिघडू शकतो. या लेखात आपण अशा पाच प्रकारच्या चाटबद्दल जाणून घेऊ. जे चविष्ट देखील आहे आणि तुम्ही हे चाट स्नॅक्समध्ये सेवन करू शकता. चला जाणून घेऊया.

स्प्राउट्स तिखट चाट

वजन कमी करण्याच्या प्रवासात मूग आणि काळे चणे हे अत्यंत फायदेशीर मानले जातात कारण ते प्रथिने समृद्ध असतात, परंतु ते दररोज खाणे कंटाळवाणे होऊ शकते. स्प्राउट्स चविष्ट बनवण्यासाठी त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाका. आता त्यात तिखट चव येण्यासाठी लिंबाचा रस टाका किंवा त्याऐवजी बारीक चिरलेले कच्च्या आंब्यांच्या फोडी देखील मिक्स करू शकतात. चवीनुसार मीठ आणि कुस्करलेली काळी मिरी घाला. तुमचा चविष्ट चाट तयार होईल.

मूग-मखाना चाट

तुम्ही स्नॅक्ससाठी मूग मखाना चाट बनवू शकता. मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाण्यातून बाहेर काढा. ही डाळ एका बारीक कॉटनच्या कापडात किंवा चाळणीत ठेवा जेणेकरून त्यात पाणी अजिबात शिल्लक राहणार नाही. आता पॅनमध्ये थोडे तूप टाकुन त्यात डाळ चांगली भाजून घ्या जेणेकरून उरलेला ओलावा कमी होईल आणि डाळीत कच्चापणाही निघून जाईल. तसेच दुसऱ्या कडईत मखाना कुरकुरीत होईपर्यंत कोरडे भाजून घ्या. त्यानंतर मुगाची डाळ आणि मखाना दोन्ही एकत्र करा. नंतर तुम्ही हा चाट चिंचेच्य किंवा पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह करा. हे चाट लगेच खावे, नाहीतर मखान्याचा कुरकुरीतपणा कमी होईल.

शेंगदाणे, पफ्ड राईस चाट

तुम्ही स्नॅक्स म्हणून शेंगदाणे, पफ्ड राईस चाट म्हणजेच शेंगदाणे आणि पफ्ड राईस चाट बनवू शकता आणि खाऊ शकता. हे करण्यासाठी, दोन्ही घटक कोरडे भाजून घ्या जेणेकरून त्यांना कुरकुरीतपणा येईल. आता एका भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि फुगवलेले तांदूळ मिसळा. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी धणे आणि हिरवी मिरची घाला. यानंतर पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी घाला आणि चाटचा आस्वाद घ्या.

स्वीट कॉर्न चाट

सर्वप्रथम मक्याचे दाणे उकडवुन घ्या. आता उकडलेले मक्याचे दाणे एका भांड्यात काढा आणि त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस, चिरलेला कांदा, चाट मसाला, भाजलेले जिरे पावडर टाकून चांगले मिक्स करून खाण्यास तयार आहे वेटलॉस हेल्दी चाट.

उकडलेल्या चण्यांचा चाट

जर तुम्हाला स्प्राउट्स आवडत नसतील तर तुम्ही काळे चणे उकडवून खाऊ शकता. तुम्ही उकडलेले काळे चण्याचा चाट म्हणून देखील सर्व्ह करू शकता. चाट बनवण्यासाठी, चणे थोडे जास्त वेळ शिजवा. यानंतर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिंचेची चटणी, चवीनुसार गोड चटणी, कुस्करलेली मिरची, काळी मिरी आणि भाजलेले जिरे पावडर, मीठ असे मूलभूत मसाले यात मिक्स करा आणि चाटचा आनंद घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)