फक्त साडीपुरतेच नाही, ‘या’ छोट्याशा सेफ्टी पिनचा वापर अशा पद्धतीनेही होतो!

सेफ्टी पिन ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्या घरात हमखास सापडते. ही लहानशी पिन केवळ साडी किंवा फाटलेले कपडे सावरण्यासाठीच नाही, तर अनेक अनपेक्षित प्रसंगी उपयुक्त ठरते. आज आम्ही अशाच पाच उपयोगी आणि रोजच्या आयुष्यातील ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या सेफ्टी पिनच्या मदतीने तुम्ही सहज करू शकता.

फक्त साडीपुरतेच नाही, या छोट्याशा सेफ्टी पिनचा वापर अशा पद्धतीनेही होतो!
Safety Pins
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 2:58 PM

सेफ्टी पिन म्हणजे फक्त साडी नीट बसवण्यासाठीच नव्हे, तर अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरणारी एक जादुई वस्तू आहे. ड्रेस डिझायनरपासून सामान्य गृहिणीपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त असलेली ही वस्तू आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक वेळा कामी येते. चला पाहूया अशा पाच भन्नाट युक्त्या, ज्या सेफ्टी पिनच्या मदतीने तुम्ही वापरू शकता.

1. ब्रेसलेट आणि नेकलेस लावताना

आपण अनेकदा ब्रेसलेट किंवा नेकलेस स्वतः घालताना अडचणीत सापडतो. एका हातानं ब्रेसलेट धरणं आणि दुसऱ्या हाताने हुक लावणं हे काम खूप कठीण वाटतं. पण सेफ्टी पिन असली, की हे काम खूप सोपं होतं. ब्रेसलेटच्या एका टोकाला सेफ्टी पिन लावा, ती पिन हातावर पकडा आणि मग दुसऱ्या हाताने हुक बंद करा. याच पद्धतीने तुम्ही तुटलेल्या किंवा लांब झालेल्या नेकलेसच्या साखळीला सुद्धा नीट लावू शकता.

2. झिप तुटली तरी काळजी नको!

जीन्स, बॅग, जॅकेट किंवा पर्सची झिप तुटली की अगदी पंचाईत होते. विशेषतः बाहेरगावी असताना हे अधिकच त्रासदायक ठरतं. अशा वेळी सेफ्टी पिन हे संकटमोचक काम करते. झिपच्या जागी सेफ्टी पिन लावा आणि ती वस्तू सहज बंद करा. हा उपाय तात्पुरता असला तरी तुम्हाला वेळेवर मदत करतो. काही फॅशन डिझायनर तर सेफ्टी पिनचा वापर झिपला हटके लूक देण्यासाठीही करतात.

3. नाडी आत टाकण्याची झटपट ट्रिक

सलवार, पायजमा, ट्रॅकपँट किंवा हूडीच्या नाडीतून दोरी पुन्हा आत टाकायची वेळ आली की त्रास होतो. बाजारात यासाठी खास साधनं मिळतात, पण ती नसली तर सेफ्टी पिन हीच तुमची मदतनीस ठरते. नाडीच्या एका टोकाला पिन लावा, कपड्याच्या आतून ती सरकवत दुसऱ्या टोकाला बाहेर काढा.

4. तुटलेल्या सँडल्ससाठी तात्पुरता उपाय

रस्त्यात चालताना चप्पल किंवा सँडल्स तुटली की अनेकदा लाजीरवाणी अवस्था होते. अशा प्रसंगी सेफ्टी पिन कामी येते. तुटलेली स्ट्रॅप सेफ्टी पिनच्या मदतीने दोन्ही बाजूंनी नीट जुळवा. हा उपाय तात्पुरता असला तरी घरापर्यंत आरामात पोहोचवतो आणि तुमचा आत्मविश्वास टिकवतो.

5. मोबाइल आणि चार्जरसाठी स्मार्ट युक्ती

स्मार्टफोनच्या सिम कार्ड ट्रेसाठी लागणारी पिन हरवली तर सेफ्टी पिन उपयोगी पडते. टोकदार सेफ्टी पिन त्या ट्रेच्या छोट्या छिद्रात टाका आणि हलकेच दाबा