‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात मोठे किल्ले, त्यांना भेट देण्यासाठी एक दिवसही पडतो अपुरा

भारतात भेट देण्यासारख्या अनेक ऐतिहासिक इमारती आणि किल्ले आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच 5 किल्ल्यांविषयी सांगणार आहोत, जे खूप मोठे आहेत.

हे आहेत भारतातील 5 सर्वात मोठे किल्ले, त्यांना भेट देण्यासाठी एक दिवसही पडतो अपुरा
भारतातील 5 सर्वात मोठे किल्ले
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 2:21 PM

भारत ही भव्य स्मारके तसेच सुंदर असे किल्ल्यांची भूमी आहे. एवढेच नाही तर भारताला अनेक जागतिक वारसे लाभलेले आहेत. जी उत्तम वास्तुकलेचे व बांधकामांचे आपल्या सर्वाना सौंदर्य दर्शवते. त्यात या प्रत्येक किल्ल्यांमागे एक भावना दडलेली आहे. तर याच किल्ल्यांना पाहण्यासाठी भारतातून व परदेशातून पर्यटक येतात. चला तर आजच्या या लेखात आपण भारतातील अशाच 5 मोठ्या किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांच्या यादीत पहिले नाव राजस्थानमधील चित्तोडगड किल्ल्याचे आहे. हा किल्ला सुमारे 700 एकरांवर पसरलेला आहे आणि एका टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला मेवाडचा अभिमान आहे आणि राणी पद्मिनी आणि राणा रतन सिंह सारख्या ऐतिहासिक पात्रांशी संबंधित आहे. किल्ल्याच्या आत तुम्हाला इतर अनेक लहान राजवाडे, मंदिरे आणि पाण्याचे स्रोत आढळतील. तुम्हाला हा किल्ला फिरताना एक दिवसही कमी पडेल.

राजस्थानमधील जोधपूर येथे असलेले मेहरानगड 15 व्या शतकात राव जोधा यांनी बांधले होते. हा किल्ला सुमारे 400 फूट उंचीवर असलेल्या टेकडीवर बांधला आहे. या विशाल किल्ल्याच्या भिंती तुम्हाला इतिहासाच्या जवळ घेऊन जातात. येथे तुम्हाला एक संग्रहालय देखील पाहायला मिळेल, ज्यामध्ये जुन्या तलवारी, शस्त्रे, पोशाख आणि पालखी आहेत.

ग्वाल्हेर किल्ला हा भारतातील सर्वात मोठ्या आणि मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला सुमारे 3 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर रुंद आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे तो एका उंच टेकडीवर बांधलेला आहे, ज्यावरून या किल्ल्याच्या मजबूतीचा अंदाजे लावता येईल. तर हा किल्ला फिरताना यामध्ये तुम्ही गुजरी महल, मान मंदिर, सास-बहू मंदिर आणि टेलिस्कोप पॉइंट सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

गोलकोंडा हा किल्ला जुन्या हैदराबादमध्ये आहे आणि सुमारे 11किलोमीटर पसरलेला आहे. कुतुबशाही राजवंशाची ही राजधानी होती आणि हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होती. असे म्हटले जाते की कोहिनूर हिरा देखील येथेच काढला जात असे. त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दारावर टाळ्या वाजवल्याने आवाज वरच्या मजल्यावर पोहोचतो.

दिल्लीच्या लाल किल्ल्याबद्दल सर्वांना माहिती आहे. हा सर्वात मोठ्या आणि सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे. तो 1648 मध्ये मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. लाल दगडांनी बनवलेल्या या किल्ल्यात दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, रंगमहाल आणि मोती मस्जिद अशी अनेक ठिकाणे आहेत.