सावधान! तुमचाही एसी फुटु शकतो ? ‘ही’ लक्षणं दिसताच हे उपाय करा आणि सुरक्षित रहा!

उन्हाळ्याच्या तडाख्यात एसी म्हणजे मोठा आधार, पण जर तुमच्या एसीमध्ये अचानक काही अडचणी येऊ लागल्या तर सावधान व्हा! काही विशेष लक्षणं ही संकेत असतात की तुमचा एसी बिघडण्याच्या मार्गावर आहे. वेळेत उपाय केल्यास मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. चला जाणून घेऊया कोणती आहेत ही लक्षणं आणि काय उपाय करावेत!

सावधान! तुमचाही एसी फुटु शकतो ? ही लक्षणं दिसताच हे उपाय करा आणि सुरक्षित रहा!
| Edited By: | Updated on: May 14, 2025 | 3:01 PM

उन्हाळा सगळीकडेच खूप वाढला आहे इतकं उन तापलं आहे की घराबाहेर जाण्याचीही भीती वाटते आणि घरात AC शिवाय राहणं अशक्य होतं. बाहेरचं तापमान 50 अंशांपेक्षा जास्त झालं असून, घरांच्या तापलेल्या भिंतींचा त्रास कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे AC,  त्यामुळे अनेक घरांमध्ये AC दिवसाचे 20 ते 24 तास सुरूच असतो. मात्र, अशा सतत वापरामुळे AC स्फोटाच्या घटनाही वाढल्या असून, त्यात जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान होत आहे.

AC अचानकच फुटतो असं नाही. तो बिघडण्यापूर्वी किंवा स्फोट होण्याच्या आधी काही ठळक संकेत देतो. जर हे संकेत वेळेवर लक्षात घेतले, तर मोठा अपघात टाळता येतो आणि जीवित तसेच आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो. आज आपण अशा 5 महत्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे AC स्फोट किंवा कोणत्याही मोठ्या बिघाडाच्या आधी दिसून येतात.
आवाजाकडे दुर्लक्ष करू नका

AC चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो शांतपणे कार्य करतो आणि खोली थंड ठेवतो. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्याची वेळच्यावेळी सर्व्हिसिंग केली जाते. जर AC अनेक दिवस सर्व्हिस न करता सतत वापरला, तर त्यात अडथळे (ब्लॉकेज) निर्माण होतात. यामुळे कंप्रेसरवर अतिरिक्त ताण येतो आणि AC मधून सामान्यपेक्षा जास्त आवाज येऊ लागतो. ही एक महत्त्वाची चेतावणी असते की तुमचा AC लवकरच बिघडू शकतो किंवा त्यात स्फोट होण्याची शक्यता असते.

कसे तपासाल एसी ?

1. हात लावून तपासा : सामान्य परिस्थितीत AC खोली थंड ठेवताना स्वतःही थंडच राहतो. जर तुम्ही AC च्या बाहेरील भागाला हात लावला आणि तो नेहमीप्रमाणे थंड वाटला, तर काही चिंता नाही. पण जर AC ची बॉडी गरम वाटू लागली, तर ती धोक्याची सूचना असू शकते. ही उष्णता AC मधून जास्त गरम हवा निर्माण होण्याचं लक्षण असू शकतं, ज्यामुळे आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा संभव वाढतो.

2. कूलिंगवर लक्ष ठेवा : तुम्हाला कदाचित हे माहितच असेल की, AC ला दीर्घकाळ चालू ठेवण्याने त्याच्या कूलिंगवर परिणाम होतो. पण जर तुमचा AC कमी वेळ चालवूनही कूलिंग कमी करू लागला, तर हे एक इशारा आहे की त्यात बिघाड होऊ शकतो. आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, तर प्रचंड उकाड्यात AC मध्ये स्फोट होण्याची शक्यता आहे.

AC वापरणाऱ्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत असते की, तो सतत थंड हवा देत राहतो. ही AC ची सामान्य स्थिती आहे. पण जर तुमचा AC थोड्या-थोड्या वेळाने हवा देऊ लागला, तर त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. याचा अर्थ म्हणजे AC च्या कंप्रेसरमध्ये समस्या आहे आणि अधिक वेळ चालवल्यास त्यात स्फोट होण्याची शक्यता आहे.

3. एसीचा मोड तपासा : एसीच्या रिमोटमध्ये विविध मोडवर चालवण्याचे पर्याय दिले जातात. यामध्ये कूल मोड (Cool Mode), ड्राय मोड (Dry Mode), फॅन मोड (Fan Mode), स्लीप मोड (Sleep Mode), टर्बो मोड (Turbo Mode), एनर्जी सेवर मोड (Energy Saver Mode) आणि हीट मोड (Heat Mode) यांसारखे प्रमुख फीचर्स असतात. जर तुमच्या एसीचा मोड काम करत नसेल, तर याचा अर्थ त्यात बिघाड आहे आणि ते स्फोट होऊ शकते.