लघवीचा घाणेरडा वास येतोय? अजिबात दुर्लक्ष करु नका, या गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे
लघवीला वास येणे काही गंभीर आजारांचे लक्षण आहे. त्यामुळे जर तुमच्या लघवीला वास येत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करु नका...

आपले शरीर आजारी पडल्यावर विविध प्रकारचे संकेत देते, ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्यांचा अंदाज येऊ शकतो. ही लक्षणे हात, पाय, मान, चेहरा, जीभ किंवा शरीराच्या इतर भागांवर दिसू शकतात. परंतु, आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लघवीच्या रंगात आणि वासात होणारे बदल हे देखील आपल्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती देतात. त्यामुळे गंभीर आजारांच्या निदानासाठी डॉक्टर मूत्र तपासणीची शिफारस करतात. जर तुमच्या लघवीतून असामान्य वास येत असेल, तर यामागे काही गंभीर आरोग्य समस्या असू शकतात. चला, जाणून घेऊया या समस्यांबद्दल आणि त्यांना वेळीच ओळखून गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी काय करावे.
यूटीआयची लक्षणे
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) ही विशेषतः महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. सार्वजनिक शौचालयांचा वापर, शरीरात पाण्याची कमतरता किंवा इतर कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. लघवीतून तीव्र वास येणे हे यूटीआयचे प्रमुख लक्षण आहे. जेव्हा संसर्ग मूत्रमार्ग आणि मूत्रपिंडांवर परिणाम करतो, तेव्हा लघवीला अप्रिय वास येऊ लागतो. यासोबतच जळजळ, खाज, पांढरे स्राव, लघवीचे थेंब टपकणे किंवा वारंवार लघवीला जाण्याची गरज यांसारख्या समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वाचा: घरच्या घरी बनलवलेली फक्त ही 3 पेय प्या, आयुष्यात कधीच होणार नाही कॅन्सस!
सिस्टिटिस म्हणजे काय?
सिस्टिटिस हा मूत्राशयाचा संसर्ग आहे, ज्यामुळे मूत्राशयाला सूज येते. अशा वेळी लघवीतून तीव्र वास येण्याची समस्या निर्माण होते. याशिवाय, सिस्टिटिसमुळे लघवी करताना जळजळ आणि यूटीआयच्या इतर लक्षणांचा त्रास होतो. जर तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील, तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.
रक्तातील साखरेची पातळी कशी ओळखावी?
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा लघवीला ग्लुकोजसारखा वास येऊ लागतो. मधुमेहाच्या रुग्णांनी अशा लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे आणि तात्काळ रक्तातील साखरेची तपासणी करावी, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील.
मूत्रपिंडांचे आजार
आपल्या शरीरातील दोन्ही मूत्रपिंड रक्त गाळण्याचे आणि लघवीद्वारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करतात. परंतु, जेव्हा शरीरात टॉक्सिन्सचे प्रमाण वाढते, तेव्हा लघवीतून दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवते. कालांतराने ही विषारी द्रव्ये मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम करू लागतात. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
यकृताचे विकार
यकृताशी संबंधित कोणत्याही समस्येची लक्षणे मल आणि लघवीतून दिसू लागतात. विशेषतः कावीळसारख्या आजारात लघवीला तीव्र वास येऊ लागतो. जर लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल आणि त्यातून तीव्र वास येत असेल, तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
