
Chanakya Niti : भारतातील वैदिक ज्योतिष हा असा अथांग महासागर आहे, ज्यातून अनेक विद्या विकसित झाल्या आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणेच, एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेण्यासाठी मानवी शरीराच्या अवयवांचे वाचन केले जाते. समुद्रशास्त्र हे देखील असेच एक शास्त्र आहे. हे ज्ञान असणाऱ्यांना माणसाच्या शरीराचे अवयव पाहून किंवा त्याचे वाचन करून, समोरील माणासाचा स्वभाव कसा आहे, आणि तो भविष्यात काय करू शकतो हे शोधता येते.
समुद्रशास्त्र हे मनुष्याची ती रहस्येदेखील उघड करू शकतं, जी रहस्य कोणालाच माहीत नसतात. उदाहरणार्थ – एखाद्या महिलेचे किंवा पुरूषाचे डोळे, नाक, कान, केस किंवा चेहरा पाहून त्या स्त्री किंवा पुरूषाची वागणूक, स्वभाव कसा आहे, हे जाणून घेता येऊ शकते. भविष्यात त्यांच्यासोबत काय होऊ शकते, ते काय करू शकतात, याबद्दलही सांगता येऊ शकते.
समुद्रशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांचे नाक सरळ आणि लांब असते ते व्यवहारी आणि दयाळू मनाचे असतात. तर ज्यांच नाक हे पोपटाच्या चोचीसारखे खालच्या बाजूने झुकलेले असते ते असलेले लोक अतिशय बुद्धिमान आणि भाग्यवान असतात. अशा व्यक्ती त्यांची योग्यता आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानामार्फत आयुष्यातील सर्व भौतिक सुखं मिळवू शकतात, समाधानी राहू शकतात. ज्यांचे नाक मोठं आणि लांब असतं त्या सुख-सोयींमध्ये जास्त रस असतो, अस म्हटलं जातं.
महिलांबाबातही यामध्ये बरंच काही सांगण्यात आलं आहे. ज्या महिलांचे किंवा स्त्रियांचं नाक छोट आणि पुढे थोडं जाडसर असतं त्या रोमँटिक असतात. त्यांना कांदे पोहे करून, दाखवून केलेल्या अरेंज मॅरेजपेक्षा प्रेम विवाह अर्थ लव्ह मॅरेज आवडतं. समुद्रशास्त्रानुसार, ज्या महिलांचं नाक लांब असतं त्या महिला सुखसोयींनी युक्त असं भरपूर आयुष्य जगतात. तर छोट्या नाक असलेल्या स्त्रियांचा आयुष्य हे अतिशय संघर्षमय असतं. तर पुरूषांमध्ये ज्यांच्या नाकांची छिद्र लहान असतात, ते भाग्यवान समजले जातात.