
विमानाने केला जाणारा प्रवास हा आरामदायक आणि सोयीस्कर असतो, यासाठी अधिक लोकं विमानाने प्रवास करतात. लांबच्या प्रवासात तुम्ही काही तासांतच हजारो मैलांचे अंतर कापून तुमच्या ठिकाणी पोहोचू शकता. आज लोक ट्रेनपेक्षा विमान प्रवासाला अनेकजण प्राधान्य देतात. पण जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुमच्या लक्षात आले आहे का की प्रवासादरम्यान कानात वेदना जाणवू लागतात. तर हा अनुभव काहीसा त्रासदायक वाटू लागतो.
साधारणपणे या आवाजामुळे तुम्हाला काहीही इजा होत नाही पण काही लोकांना हा अनुभव अस्वस्थ वाटतो. ही समस्या विशेषतः विमानाच्या टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान उद्भवते. आजच्या या लेखात आपण विमान प्रवासा दरम्यान ही समस्या का होते आणि त्यावर उपाय काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात…
विमान प्रवासात कानाला त्रास का होतो?
आपल्या कानात युस्टाचियन ट्यूब नावाची एक नळी असते. ती कानाच्या मधल्या भागाला घशाच्या मागच्या भागाशी जोडते. तिचे काम कानात हवेचा दाब समान ठेवणे आहे. तर अशावेळेस जेव्हा आपण विमानात प्रवास करतो तेव्हा हवेचा दाब वेगाने बदलतो. बऱ्याच वेळा ही नळी इतक्या लवकर प्रतिसाद देऊ शकत नाही, ज्यामुळे कानाच्या आत आणि बाहेरील दाबात असंतुलन निर्माण होते. याच कारणामुळे कानात ‘पॉप’ किंवा विचित्र आवाज ऐकू येतो, किंवा कानाला दडे बसतात याला एअरप्लेन इअर असे म्हणतात.
एअरप्लेन इअरची लक्षणे काय आहेत?
कानात सौम्य वेदना जाणवणे
कान जड किंवा बंद झालेत असे वाटणे
काहींना तीव्र वेदना होणे
कानाचा पडद्यावर ताण पडणे
ऐकायला कमी येणे
कानातून रक्त येणे
चक्कर येणे
कानात सतत घंटी वाजत असलेला आवाज येत राहणे
कोणत्या लोकांना जास्त धोका आहे?
लहान मुलांना
जेव्हा तुम्हाला सर्दी, ताप असेल.
तुमच्यापैकी कोणाला सायनस किंवा कानाचा संसर्ग असेल तर त्यांना याचा त्रास होतो.
ॲलर्जी असलेले लोकांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो.
जर तुम्ही विमान टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान झोपलेले असाल तेव्हा हा त्रास जाणवतो.
ते कसे टाळायचे?
विमान प्रवासादरम्यान जांभई देणे किंवा च्युइंगम चघळणे या साध्या कृतीतून तुम्हाला या समस्या पासून आराम मिळेल.
तुमचं नाक बोटांनी बंद करा. तोंड बंद ठेवून नाकातून हळूहळू श्वास सोडा . यामुळे दाब संतुलित होण्यास मदत होते.
विमान प्रवासादरम्यान कानात इअरफोन घाला.
तर तुम्ही जेव्हा विमानातून प्रवास कराल आणि कानाला दडे बसले तर घाबरून जाऊ नका वर सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि प्रवास सुखकर करा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)