केस आणि त्वचेसाठी गुणकारी बदामाचे तेल, जाणून घ्या फायदे

| Updated on: Mar 27, 2021 | 9:40 AM

केसांच्या आरोग्यासाठी तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. परंतु, जेव्हा आपण आपल्या केसांसाठी योग्य तेलाची निवड करता, केवळ तेव्हाच केसांची योग्य वाढ होणे शक्य असते.

केस आणि त्वचेसाठी गुणकारी बदामाचे तेल, जाणून घ्या फायदे
मुलतानी माती हे केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती पावडर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून जाड पेस्ट बनवा. आता हा पॅक आपल्या केसांमध्ये लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
Follow us on

मुंबई : केसांच्या आरोग्यासाठी तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. परंतु, जेव्हा आपण आपल्या केसांसाठी योग्य तेलाची निवड करता, केवळ तेव्हाच केसांची योग्य वाढ होणे शक्य असते. बाजारात अनेक प्रकारची तेलं उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आपण कोणतेही तेल जाहिरात पाहून वापरण्यास सुरूवात करतो आणि काही फायदा होत नसल्यास आपण ते त्वरित बदलतो. या प्रकारचा प्रयोग केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत नाही तर आणखी हानिकारक ठरू शकतो. (Almond oil is beneficial for hair and skin)

तुम्हाला खरोखर आपले केस चमकदार, मजबूत आणि दाट बनवायचे असतील तर खाली दिलेल्या टिप्स फाॅलो करा. बदामाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण अद्याप हे तेल आपल्या केसांवर वापरलेले नाही, तर एकदा नक्की वापरून पाहा. बदामाचे तेल आपल्या केसांना लावल्याने आपले केस रेशमी होतील, केसांची लांबी लवकर वाढेल, केस दाट होतील आणि केस काळे राहतील. एवढेच नाहीतर बदामाचे तेल आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

बदामाच्या तेलात विटमिन ए, विटमिन बी 7, विटमिन ई, एसपीएफ 5, बायोटिन, अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात. यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी बदामाचे तेल आपल्या त्वचेला लावले पाहिजे. सेन्सिटिव्ह केसांसाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय गुणकारी ठरते. हे तेलाबरोबरच केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून देखील काम करते.ऑलिव्ह ऑईलमुळे केस मजबूत होतात आणि केस फाटे फुटण्याच्या समस्येपासून मुक्त होतात.

शक्यतो रात्रीच्या वेळेस केसांवर ऑलिव्ह ऑईल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी शॅम्पूने आपले डोके धुवा. हजारो वर्षांपासून आवळ्याचे अर्थात आमला तेल वापरले जाते. या तेलामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होतात. परंतु, जर आपल्या केसांत खाज सुटण्याची समस्या असेल किंवा आपल्या केसांमध्ये जास्त कोरडेपणा असेल, तर आमला तेल हानिकारक ठरू शकते. अशा लोकांनी आवळ्याच्या तेलाचा वापर टाळावा.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

(Almond oil is beneficial for hair and skin)