Aloe Vera Hair Mask: ‘मऊ’ आणि ‘चमकदार’ केसांसाठी वापरून पहा एलोवेरा हेअर मास्क!

| Updated on: Jul 26, 2022 | 4:25 PM

Aloe Vera Hair Mask: प्रत्येकाला मऊ आणि चमकदार केसांची आवड असते. यासाठी अनेक उपाय वापरून पाहीले जातात. परंतु, हाती निराशा येते. अशावेळी तुम्ही, केसांसाठी कोरफडीपासून बनवलेला हेअर मास्क देखील वापरून पाहू शकता.

Aloe Vera Hair Mask: ‘मऊ’ आणि ‘चमकदार’ केसांसाठी वापरून पहा एलोवेरा हेअर मास्क!
Follow us on

कोरफड जेलचा वापर केल्याने, केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. त्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. कोरफडीचा वापर अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये (In beauty products) केला जातो. हे निरोगी त्वचा आणि सुंदर केस राखण्यास मदत करते. कोरफडीमुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. हे केसांना खोलवर पोषण देण्याचे काम करते. कोरड्या, निस्तेज आणि निर्जीव केसांची समस्या (Lifeless hair problem) दूर करण्याचे काम करते. कोरफडीचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता. हे हेअर मास्क बनवायला आणि वापरायलाही खूप सोपे असतात. जाणून घ्या, एलोवेरा हेअर मास्क (Aloe Vera Hair Mask) बनवण्यासाठी तुम्ही कोणते पदार्थ वापरू शकता.

एलोवेरा जेल वापरा

यासाठी तुम्हाला फक्त एलोवेरा जेल लागेल. एलोवेरा जेल एका भांड्यात घ्या. ते पातळ करण्यासाठी तुम्ही पाणी घालू शकता. ते तुमच्या केसांवर तसेच टाळूवर लावा. 20 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर मास्क तुमचे केस निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतो.

कोरफड आणि खोबरेल तेल हेअर मास्क

हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे कोरफड जेल घ्या. त्यात २ चमचे खोबरेल तेल घाला. या दोन गोष्टी नीट मिसळा. हे मिश्रण टाळूवर तसेच केसांना लावा. याने काही वेळ टाळूला मसाज करा. हा हेअर मास्क केसांवर 30 ते 40 मिनिटे राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. यामुळे तुमचे केस मऊ होण्यास मदत होईल.

कोरफड जेल आणि योगर्ट हेअर मास्क

एका भांड्यात दोन चमचे दही घ्या. त्यात 3 ते 4 चमचे कोरफड जेल घाला. या दोन गोष्टी एकत्र करा. हा हेअर मास्क टाळूवर तसेच केसांना लावा. 30 ते 40 मिनिटे केसांवर राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

कोरफड आणि केळी हेअर मास्क

हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका पिकलेल्या केळ्याचे छोटे तुकडे करून ब्लेंडरमध्ये ठेवा. त्यात २ ते ३ चमचे एलोवेरा जेल टाका. या दोन गोष्टी नीट मिसळा. हा हेअर मास्क केसांवर आणि टाळूवर लावून केसांचा अंबाडा बांधा. 30 ते 40 मिनिटे असेच राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.