
ताणतणाव, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे तसेच कोरडेपणा आजकाल या समस्या सामान्य बनल्या आहेत. तर केसांच्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेकदा महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्टचा अवलंब करतो, परंतु कालांतराने त्यांचे दुष्परिणाम आपल्या केसांवर होऊ शकतो. अशातच तुम्हाला केस मजबूत आणि जाड करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे अधिक फायदेशीर ठरेल. याकरिता कडुलिंब आणि तुळस केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. या दोन्ही औषधी वनस्पती शतकानुशतके आयुर्वेदात त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरल्या जात आहेत. त्यांच्यापासून बनवलेला हेअर मास्क केसांना मजबूत आणि जाड करण्यास मदत करू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण हा हेअरमास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात.
कोंडा कमी होतो – कडुलिंब स्कॅल्प स्वच्छ ठेवते आणि कोंडा निर्माण करणारे बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट करते.
केस मजबूत होतात – कडुलिंबामध्ये असलेले घटक केसांची मुळे मजबूत करून केस गळती कमी करण्यास मदत करते .
स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करते – कडुलिंबातील हे घटक स्कॅल्पवरील घाण काढून टाकते त्यामुळे खाज येत नाही आणि संसर्ग देखील रोखता येते.
त्याचवेळी तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
केसांची वाढ – तुळशीमुळे स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.
केस चमकदार होतात- तुळशीमध्ये असलेले हे घटक केस चमकदार आणि मऊ बनवते.
संसर्गापासून संरक्षण- कोणत्याही प्रकारचे स्कॅल्पचे संक्रमण किंवा खाज कमी करण्यासाठी तुळस खूप प्रभावी आहे.
साहित्य
हेअरमास्क बनवण्याची पद्धत
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)