कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल

चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते. कॉफीबाबत एक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आणि या रिलनुसार असे सांगण्यात आले आहे की कॉफी बीन्स दळून कॉफी पावडर तयार करताना लहानमोठे किडे, झुरळे देखील त्यात कुस्करली जातात. FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल

कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल
Are cockroaches also crushed while making coffee?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2025 | 4:01 PM

चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात. पण कॉफीबाबत एक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामुळे लोक अस्वस्थ झाली आहेत. या रीलमध्ये असे सांगितले जात आहे की कॉफीमध्ये झुरळे कुस्करलेले असतात. एवढंच नाही तर यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने देखील काही प्रमाणात झुरळे आणि कीटकांची उपस्थिती मान्य केली आहे. हे प्रकरण अमेरिकेपासून सुरू झाले परंतु हे भारतातही घडत असण्याची शक्यता आहे.

कॉफीमध्ये झुरळे आहेत हे आपल्याला कसे कळले?

कॉफीमध्ये झुरळे असू शकतात हे अमेरिकेतील काही तपासांवरून समोर आलं आहे news.com.au च्या वृत्तानुसार, 80 च्या दशकात, एक बायलॉजी प्राध्यापक इन्स्टंट कॉफी पिण्यासाठी लांब प्रवास करत जात असत. त्यांच्यासोबत असलेले प्राध्यापक आश्चर्यचकित झाले की त्यांना कॉफीची इतकी आवड आहे आणि ते वारंवार कॉफी पिण्यासाठी इतके लांब प्रवास का करतात. यावर, त्यांना कळले की जर त्यांनी आधीच ग्राउंडेड असलेली कॉफी प्यायली तर त्यांना तीव्र ऍलर्जी होते. त्यांना झुरळांमुळे देखील अशीच ऍलर्जी व्हायची.

ग्राउंड कॉफी धोकादायक असते?

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजे (एफडीए) हे देखील मान्य केले आहे की काही टक्के अन्नपदार्थांमध्ये कीटक असू शकतात कारण त्यांना पूर्णपणे काढून टाकणे शक्य नाही. विशेषतः प्री-ग्राउंड कॉफीमध्ये आणि काही कीटक कॉफी बीन्समध्ये आढळतात. तसेच, कॉफी साठवलेल्या ठिकाणी कीटक, झुरळे, उंदीर इत्यादी आढळतात. ते अंधारात आणि ओलसर ठिकाणी ठेवले जाते. जेव्हा ते दळले जातात तेव्हा झुरळे, त्यांची पिल्ले आणि इतर कीटक पूर्णपणे त्यातून काढून टाकणे शक्य नसते. एफडीएच्या मते, हे 10 टक्क्यांपर्यंत असू शकतात. म्हणून, हे किटीक बीन्ससह कुस्करण्याचा मोठा धोका असतो. जिथे कॉफी खूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि साठवली जाते, तिथे हा धोका जास्त वाढतो.

शुद्ध कॉफी कशी मिळवायची?

फक्त कॉफीच नाही, तर बाहेर विकल्या जाणाऱ्या बहुतेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ असण्याचा किंवा त्यात कीटक असण्याचा धोका असतो. हे सर्वत्र लागू आहे, मग ते अमेरिका असो किंवा भारत. जर तुम्हाला कॉफी खूप आवडते आणि ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला कॉफी पिण्याची इच्छा होत नसेल, तर तुम्ही ताजी कॉफी खरेदी करू शकता, ती स्वतः निवडू शकता आणि बारीक करू शकता. बाजारात आता कॉफिचे असे अनेक प्रकार आले आहेत ज्यातून तुम्ही योग्य ती कॉफी विकत घेऊ शकता.