AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण

मिर्ची खाल्ल्यावर किंवा तिखट लागल्यावर तुम्हीही लगेच पाणी पित असाल तर आधी ही सवय थांबवा. अन्यथा जास्त त्रास होऊ शकतो. त्याऐवजी पटकन या पदार्थांचे सेवन करा पण पाणी पिऊ नका. याचं कारण बऱ्याच जणांना माहित नसेल.

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण
Avoid drinking water after eating chili or anything spicyImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 20, 2025 | 5:47 PM
Share

अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अचानक अनेकदा दाताखाली पटकन मिर्ची येते जीभ झोंबू लागते. तोंडाची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि कान आणि डोळे लाल होऊ लागतात. अशा वेळी, लोक सहसा टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलतात आणि संपूर्ण पाणी पितात. पण, यामुळे पोट भरतं पण जळजळ काही कमी होत नाही. उलट, पाणी पिल्याने तोंडापासून पोटापर्यंत जळजळ अजून वाढते. मग मिर्ची खाल्ल्यावर पाणी पिणे योग्य नसेल तर मग तोंडांची जळजळ कमी करण्यासाठी नक्की काय करावं, जेणेकरून तोंडात होत असेलला तिखटाचा त्रास पटकन कमी होईल? चला जाणून घेऊयात.

पाण्याऐवजी हा पदार्थाचे सेवन करा

मिरच्यांच्या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन खूप प्रभावी आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केसीन नावाचे रसायन असते . ते त्वचे आणि तोंडातील जळजळीला त्वरित शांत करते.जर तुम्ही दूध, दही किंवा अशा गोष्टी काही काळ तोंडात ठेवल्या तर तुम्हाला जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल. हा उपाय हातांवर जळजळ झाल्यास देखील उपयुक्त आहे.

गोड पदार्थ खा जर त्यावेळी तुमच्या जवळ दूध उपलब्ध नसेल तर लगेच काहीतरी गोड पदार्थ खा. विशेषतः दुधापासून बनवलेल्या मिठाई जळजळ लवकर शोषून घेण्याचे काम करतात. यामुळे थोड्याच वेळात आराम मिळतो.

पाणी पिणे टाळा पाणी पिल्याने मिर्ची जळजळ कमी होण्याऐवजी वाढते. मिर्चीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे तेल-आधारित संयुग आहे, जे पाण्यासोबत पसरू शकते आणि पोट आणि आतड्यांमध्ये आणखी जळजळ होऊ शकते. म्हणून, पाण्याऐवजी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.

पाणी पिऊन या वेदना जास्त वाढण्याची शक्यता

खरंतर, खूप मिर्च्या जेवणातून पोटात जाणे किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर, जळजळ होण्याची भावना अनेकांसाठी खूप वेदनादायक असू शकते.त्यामुळे कधी तिखट खाल्ल्याने तोंड भाजलं किंवा जळजळ झाली तर पाणी पिण्याऐवजी गोड पदार्थ खा. अन्यथा पाणी पिऊन या वेदना जास्त वाढण्याची शक्यता असते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.