तुम्हालाही कॉम्बिनेशन स्किनचा त्रास सतावतोय? तर ‘हे’ आयुर्वेदिक फेशियल वापरून पहा, पार्लरसारखी मिळेल चमक

सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय खूप उपयुक्त आहेत. घरी आयुर्वेदिक फेशियल करणे हा कॉम्बिनेशन स्किनसाठी एक चांगला पर्याय आहे. या आयुर्वेदिक फेशियलच्या मदतीने तुम्ही घरी पार्लरसारखी चमक मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर मग आजच्या या लेखात घरी आयुर्वेदिक फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊयात.

तुम्हालाही कॉम्बिनेशन स्किनचा त्रास सतावतोय? तर हे आयुर्वेदिक फेशियल वापरून पहा, पार्लरसारखी मिळेल चमक
Ayurvedic Facial
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 5:49 PM

सुंदर दिसण्यासाठी मेकअप किंवा महागडे ब्युटी प्रोडक्ट्सच नाही तर काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही सुंदर दिसू शकतात. आजकाल लोकं त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. निस्तेज त्वचा ही या समस्यांपैकी एक आहे, ज्यामुळे अनेकदा चेहऱ्यावरील चमक कमी होते. अशा वेळेस त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही अनेकदा ब्युटी पार्लरमध्ये जातात आणि फेशियल करतात.

फेशियल करताना मात्र केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर केला जातो आणि हे प्रोडक्ट त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर ठरतील असे नाही. विशेषतः ज्यांच्या त्वचेचा प्रकार हा कॉम्बिनेशन असेल तर चेहऱ्यावर काय वापरावे हे समजत नाही. अशातच तुमची त्चचा देखील कॉम्बिनेशन स्किन असलेल्यांपैकी असेल तर तुम्ही घरी आयुर्वेदिक फेशियलचा वापर करून पाहू शकता. घरी स्टेप बाय स्टेप फेशियल कसे करायचे ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

स्टेप 1

  • क्लिजींग करिता लागणारे साहित्य
  • 1 टेबलस्पून बेसन
  • 1 चमचा कच्चे दूध
  • एक चिमूटभर हळद
  • क्लिजींग कशी करावी

वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि पेस्ट बनवा. आता त्वचा थोडीशी ओली करा आणि ओल्या त्वचेवर ही पेस्ट लावून हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचा जास्त कोरडी न होता घाण साफ होते.

स्टेप २

  • एक्सफोलिएशनसाठी साहित्य:
  • 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर
  • 1 चमचा मध
  • लिंबाचा रस

एक्सफोलिएशन कसे करावे

वरील सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट त्वचेवर लावून हलक्या हातांनी वर्तुळाकार हालचालीत चेहऱ्यावर मालिश करा. विशेषतः नाक, हनुवटी आणि कपाळाभोवती चांगले मालिश करा. यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने निस्तेज त्वचेवर चमक येते आणि मृत पेशी निघून जातात.

स्पेट 3

  • त्वचेला वाफ देण्यासाठी लागणारे साहित्य
  • गरम पाणी घ्या
  • तुळशीची पाने
  • काही गुलाबाच्या पाकळ्या किंवा कडुलिंबाची पाने
  • वाफ कशी घ्यावी

गरम पाण्यात तुळशीची पाने आणि गुलाबाच्या पाकळ्या किंवा कडुलिंबाची पाने टाका. नंतर चेहऱ्यावर 3-4 मिनिटे वाफ घ्या. असे केल्याने छिद्रे उघडतात आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते.

स्पेट 4

  • हर्बल फेस पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
  • 1 टेबलस्पून चंदन पावडर
  • 1 टीस्पून कोरफड जेल
  • गुलाब पाणी
  • फेस पॅक कसा बनवायचा

सर्वप्रथम सर्व घटक घेऊन गुलाबपाण्याचा वापर करून ही पेस्ट तयार करा. नंतर या पेस्टचा मध्यम थर चेहऱ्यावर लावा. आता ते 15 मिनिटे किंवा सुकेपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेस पॅक त्वचेला आराम देतो, तेल नियंत्रित करतो आणि ताजेपणा देतो.

स्पेट 5

  • DIY टोनर
  • गुलाबपाणी किंवा काकडीचा रस

टोनर कसे वापरावे

टोनिंगसाठी तुम्ही गुलाबपाणी किंवा काकडीचा रस वापरू शकता. यासाठी तुम्ही ते थेट स्प्रे करू शकता किंवा कापसाच्या गोळ्याच्या मदतीने हलक्या हाताने लावू शकता. यामुळे पीएच संतुलन राखण्यास आणि उघड्या छिद्रांना घट्ट करण्यास मदत होते.

स्पेट 6

  • मॉइश्चरायझिंग आयुर्वेदिक सीरमसाठी साहित्य
  • 2-3 थेंब आयुर्वेदिक कुमकुमादी तेल किंवा कोल्ड-प्रेस्ड तिळाचे तेल
  • मॉइश्चरायझिंग आयुर्वेदिक सीरम कसे लावायचे

मॉइश्चरायझिंग आयुर्वेदिक सीरम वापरण्यास खूप सोपे आहे. यासाठी ओल्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून ओलावा टिकून राहील आणि त्वचा चमकदार होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा

फेशियल केल्यानंतर, फ्रेश लूकसाठी तुमच्या चेहऱ्यावर बर्फाचा एक छोटा तुकडा 30 सेकंदांसाठी हलक्या हाताने फिरवा. हे देखील लक्षात ठेवा की घरी बनवलेले हे आयुर्वेदिक फेशियल करण्यासाठी तुम्हाला 35-40 मिनिटे लागतील. तसेच, आठवड्यातून एकदा ते करणे फायदेशीर ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)