AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Old Monk, Bagpiper आणि RC सह अनेक लोकप्रिय मद्याच्या विक्रीवर बंदी, काय झाले नेमके ?

Liquor Brands Banned: FSSAI ने केलेल्या चाचणीत आर्टिफिशियल वा नेचर - आयडेंटिकल फ्लेवरिंग आढळल्यानंतर ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, बॅगपायपर आणि एंटीक्विटी ब्ल्यूच्या काही खास व्हेरिएंट्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Old Monk, Bagpiper आणि RC सह अनेक लोकप्रिय मद्याच्या विक्रीवर बंदी, काय झाले नेमके ?
Liquor Brands Banned
| Updated on: Aug 03, 2026 | 3:43 PM
Share

Liquor Brands Banned : फूड सेफ्टी रेग्युलेटर FSSI ( भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ) या संस्थेने ओल्ड माँक, एंटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स सारख्या नामवंत मद्याच्या ब्रँडच्या काही व्हेरिएंट्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या पावलामागे या मद्यात आर्टिफिशियल फ्लेवर आढळले असून ते मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्सच्या नुसार नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहै.

फ़ूड सेफ्टी एँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( FSSAI ) ने काही भारतीय मद्याच्या ब्रँडवर कारवाई केली आहे. यात डियाजिओ इंडियाच्या युनायडेट स्पिरिट्स, इनब्रु बिव्हरेजेस आणि मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर द्वारा तयार करण्यात आलेल्या काही उत्पादनात मद्याचा सारखा स्वाद आणि सुंगध आणण्यासाठी बाहेरुन आर्टिफिशियलस वा नेचर आयडेंटिकल फ्लेवरचा वापर केला गेला होता. वास्तविक यात मद्याची निर्मिती करताना नैसर्गिक सामुग्री आणि योग्य प्रकारचे मॅच्युअर करण्याच्या प्रक्रियेचा वापर केला जाणे गरजेचे होते.

कोठे लावली विक्रीवर बंदी ?

या नियामक संस्थेने मध्य प्रदेशाताली युनायटेड स्पिरिट्सने तयार केलेल्या एंटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रु बिवरेजेसने तयार केलेली बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रमच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरने तयार केलेली ओल्ड माँकच्या तीन व्हेरिएंटवर निर्बंध लागू केले आहे. ही बंदी येथे खास तयार झालेल्या प्रोडक्ट्सवर लागू असेल की अन्य जागी तयार झालेल्या याच ब्रँड्सवरही देखील लागू असणार याबाबत स्पष्टीकरण झालेले नाही.

लॅबमध्ये धक्कादायक खुलासा

नियामक संस्थेच्या मते भारतात खाद्य सुरक्षा नियम मद्यासारख्या पेयात नैसर्गिक फ्लेवरिंग पदार्थांना मिक्स करण्याची परवानगी देतात. मात्र, FSSAI च्या लॅबोरेटरीत केलेल्या कंपनीच्या काही ब्रँडच्या मद्यात कुत्रीम फ्लेवर मिक्स केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. उदा. रमच्या बाटलीच रमचा कृत्रिम फ्लेवर, व्हिस्कीच्या बाटलीत व्हिस्कीचा कृत्रीम फ्लेवर मिक्स केल्याचे उघडकीस आले आहे. भारतात अशा प्रकारे मद्यात फ्लेवर वापरण्यास परवानगी नाही.

जगातील सर्वात मोठा मद्य बाजार

भारत हा जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारापैकी एक आहे. येथील मद्य उद्योगात वार्षिक महसुल सुमारे ४० अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. मार्केटच्या हिशेबाने युनाएटेड स्पिरिट्सच्या द्वारे डिपाजिओ इंडिया देशातील सर्वात मोठी मद्य निर्मिती कंपनी आहे. आणि ही फ्रान्सची स्पिरिट कंपनी पेरनोड रेकॉर्डला टक्कर देते. FSSAI ची कारवाईच्या घेऱ्यात येणारे ब्रँडचे मद्य देशात तयार झालेले आहेत. त्यांची किंमत इम्पोर्टेट व्हिस्की, स्कॉच आणि प्रिमियम रमच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांची मागणी जास्त असते. ही कारवाई या क्षणी झाली आहे जेव्हा FSSAI संस्थेने खाद्य आणि आहाराची जास्त काळजीपूर्वक तपासणी सुरु केली आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले