
महिना कोणताही असो उष्णतेमुळे स्वयंपाकघरात जास्त वेळ उभे राहणे खूपच कठीण होऊन जाते. अशा वेळी आपल्याला असे पदार्थ हवे असतात जे लवकर तयार होतील, पचायला हलके असतील आणि त्याचबरोबर चविष्टही असतील. आज आम्ही तुम्हाला असे तीन आरोग्यदायी आणि झटपट होणारे नाश्ते सांगणार आहोत, जे तुमच्या उन्हाळ्याच्या सकाळला अधिक सोपी आणि स्वादिष्ट बनवतील.
हा एक पौष्टिक आणि पारंपरिक नाश्ता आहे, जो बनवायला फक्त 15 – 20 मिनिटे लागतात. भाज्या वापरल्यामुळे तो अधिक आरोग्यदायी होतो.
एक वाटी रवा
दोन वाट्या पाणी
एक लहान चिरलेला कांदा
बारीक चिरलेली गाजर
मटार
चिरलेला टोमॅटो
मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची
मीठ आणि तेल
एका कढईत रवा कोरडा भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
त्याच कढईत तेल गरम करा आणि त्यात मोहरी, कढीपत्ता व मिरची टाका.
आता चिरलेला कांदा घालून परतून घ्या. त्यानंतर गाजर, मटार आणि टोमॅटो घालून २-३ मिनिटे शिजवा.
पाणी आणि मीठ घालून उकळी येऊ द्या.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा हळूहळू सोडा आणि ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ येऊ द्या. उपमा तयार आहे! गरम-गरम सर्व्ह करा.
उन्हाळ्याच्या दुपारच्या जेवणासाठी पास्ता सॅलड एक उत्तम पर्याय आहे. हे बनवायला सोपे आणि खाण्यासाठी खूप ताजेतवाने वाटते.
एक वाटी उकडलेला पास्ता
एक वाटी चिरलेले चेरी टोमॅटो
अर्धी वाटी चिरलेली काकडी
काळे ऑलिव्ह (ऑप्शनल)
फेटा चीज (ऑप्शनल)
ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस
मीठ आणि काळी मिरी पूड
उकडलेला पास्ता थंड करून घ्या.
त्यात चिरलेले टोमॅटो, काकडी, ऑलिव्ह आणि फेटा चीज एकत्र करा.
एका वेगळ्या वाटीत ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी पूड मिसळा.
हे मिश्रण सॅलडवर घालून चांगले मिक्स करा.
10 मिनिटे फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.
अप्पे एक हलका आणि स्वादिष्ट दक्षिण भारतीय पदार्थ आहे. ते खूप कमी तेलात बनतात.
अप्पे बॅटर (तयार पीठ)
मीठ
तेल
अप्पेच्या पिठात थोडे मीठ मिसळा.
अप्पे पॅन गरम करून त्याला थोडे तेल लावा.
प्रत्येक साच्यात एक चमचा पीठ घाला आणि झाकण ठेवून शिजवा.
एका बाजूने शिजल्यावर अप्पे पलटा आणि दुसरी बाजू सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
गरमागरम अप्पे नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
या तीन डिशेस तुमच्या उन्हाळ्याच्या दिवसांना आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बनवतील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)