हिवाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची आहे?, मग ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या

| Updated on: Dec 15, 2020 | 1:04 AM

हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे

हिवाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची आहे?, मग या गोष्टी नक्की जाणून घ्या
Follow us on

 

मुंबई : प्रत्येकालाचा आपली त्वचा मुलायम आणि सुंदर असावी असं वाटतं. त्यासाठी कित्येक ब्यूटी प्रोडक्ट्स आपण वापरतो. हिवाळा ऋतू सुरु झाल्याने त्वचा कोरडी पडणे त्वचेवर सुरकुत्या येणे अशा समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या ऋतूमध्ये आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.  (beauty tips how to take care of your skin)

त्वचेवर सुरकुत्या येण्याचे कारण

  • प्रदूषण
  • प्रमाणपेक्षा जास्त वेळ सूर्य प्रकाशात थांबणे
  • गरजेपेक्षा जास्त मेकअप करणे

हे नुस्के वापरा आणि हिवाळ्यात चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घ्या

  • रोज सनस्क्रीन लावावे. सुरकुत्या कमी करण्यासाठी एमपीएफ 30 पेक्षा कमी असणाऱ्या क्रिमचाच वापर करा.
  • घराबाहेर पडण्याआधी चेहऱ्यावर मॉईश्चरायझर क्रीम आवश्य लावावी.
  • थंडीच्या दिवसांमध्ये चेहरा मुलायम राहण्यासाठी मॉईश्चरायझर क्रीमचा उपयोग करावा.

तसेच, हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाण्यामुळे चेहऱ्यावरील मुलायमपणा टिकून राहतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो.(beauty tips how to take care of your skin)

  • आहारात अँन्टीऑक्सिडेंट, फायबर आणि अन्य पोषक घटक असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा.
  • या व्यतिरिक्त मध, हळद, नारळाचे पाणी यांचाही उपयोग करावा. या गोष्टींचा फेसपॅक तयार करुन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तजेलदार होण्यास मदत होते.
  • ऑलिव्ह आणि दही यांचे मिश्रण तयार करुन चेहऱ्यावर लावल्यानंतर तो 20 मिनिटांपर्यंत ठेवावा. यामुळे चेहरा तजेलदार आणि हेल्दी दिसतो.

टीप : ही फक्त प्राथमिक माहिती आहे. वरील गोष्टी प्रत्यक्षात करण्यापूर्वी आरोग्य सल्लागार तसेच इतर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या.

संबंधित बातम्या :

सावधान! तुमच्या औषधांच्या पाकिटावरही ‘लाल रेघ’ आहे? जाणून घ्या तिचा नेमका अर्थ…

मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!

Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल!

(beauty tips how to take care of your skin)