Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल!

गुळात सेलेनिअम आणि झिंक यांसारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे शरिराला फ्री रेडिकल्स आणि संसर्गापासून बाचाव करतात.

Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल... तर रोज गूळ खाल!
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 9:52 PM

मुंबई : गूळ हा साखरेचा सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे (Jaggery Health Benefits) . गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं. हिवाळ्यात गुळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो (Jaggery Health Benefits).

गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.

गूळ खाण्याचे फायदे काय?

दम्याच्या त्रासात फायदेशीर ठरणार

गूळ हा दमा आणि ब्राँकायटिसपासून बचाव करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना श्वसनासंबंधी काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन गूळ खायला हवं. तिळ-गुळाचे लाडू खाणंही फायदेशीर ठरेल.

वजन कमी करण्यात मदत करते

गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सला नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच, मेटाबॉलिजम वाढवण्यातही मदत करते. तसेच, स्नायुंना बळकटी देण्याचं कामही करते.

रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यात मदत करते

रक्तदाब नियंत्रित करण्यात गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते. विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

सर्दी-पडश्यापासून बचाव होतो

सर्दीपासून बचाव करण्यासाठी गूळ प्रभावी ठरतो. काळी मिरी आणि आल्याबरोबर गूळ खाल्ल्यास सर्दीमध्ये आराम मिळतो. वारंवार खोकला येत असल्यास साखरेऐवजी गुळाचा खडा तोंडात ठेवावा. आल्याबरोबर गूळ खाल्ल्याने घसा खवखवणे आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

सांधेदुखी कमी करण्यास मदत करते

गूळ खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी रोज गूळ खायला हवं. गुळासोबत आलं घेतल्याने लवकर फरक जाणवतो (Jaggery Health Benefits).

हाडं मजबूत करण्यात मदत करते

गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करण्यास खूप उपयुक्त आहेत. गुळाबरोबर आले खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.

रोगप्रतीकारक शक्ती वाढवते

गुळात सेलेनिअम आणि झिंक यांसारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे शरिराला फ्री रेडिकल्स आणि संसर्गापासून बाचाव करतात. त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गुळाचं सेवन केलं जातं.

एनिमियापासून बचाव होतो

एनिमियापासून बचावासाठीही गूळ मदत करतं, यामध्ये आयरन आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे एनिमियापासून बचाव होतो. तसेच, गुळामुळे रक्तही स्वच्छ होतं.

Jaggery Health Benefits

संबंधित बातम्या :

Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!

Egg Benefits | अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय? थांबा, पिवळ्या बलकाचे ‘हे’ मोठे फायदे जाणून घ्या!

Weight lose Tips | वजन कमी करायचे आहे का? तर या गोष्टी टाळा…

Non Stop LIVE Update
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.