उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्टेप बाय स्टेप ‘या’ पद्धतीने करा मेकअप, दिवसभर तुमचा चेहरा दिसेल फ्रेश
ऋतूच्या बदलानुसार तुमची मेकअप करण्याची पद्धतही बदली पाहिजे. उन्हाळ्यात तुम्ही असा मेकअप करायला पाहिजे, ज्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश दिसेल आणि जास्त वेळ टिकेल. चला तर मग आजच्या लेखात आपण उन्हाळ्याच्या दिवसात तुमचा मेकअप करण्याची पद्धत कशी असली पाहिजे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

मेकअप करणे हा आजच्या लाइफस्टाइलचा एक भाग आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप केला जातो. अशातच उन्हाळ्याच्या दिवसात मेकअप करून तो जास्त वेळ टिकवून ठेवणे हे एक आव्हान असते. कारण या दिवसांमध्ये रखरखीत ऊन, घाम आणि हवेतील आर्द्रता यामुळे मेकअप खराब होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण कडक उन्हात देखील तुमचा मेकअप तासंतास फ्रेश ठेऊ शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण उन्हाळ्यात मेकअप फ्रेश दिसण्यासाठी या पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रक्रिया फॉलो करून उन्हाळ्यात कोणते मेकअप प्रोडक्ट वापरायचे ते जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकावा यासाठी वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्टचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मस्करा, आयलाइनर आणि काजळ विशेषतः वॉटरप्रूफ असावेत, नाहीतर घामामुळे ते चेहऱ्यावर पसरून तुमचा लुक खराब करू शकतात.
उन्हाळ्यातील मेकअप प्रोडक्ट
उन्हाळ्याच्या दिवसांत तुमच्या मेकअप किटमधून ऑईल बेस्ड फाउंडेशन आणि प्राइमर काढून टाका. त्याऐवजी वॉटर बेस्ड प्रोडक्टचा वापर करा. त्यानंतर उन्हाळ्यात मेकअप किटमध्ये मॅट फाउंडेशन ॲड करा. याव्यतिरिक्त तुम्ही क्रीमी आयशॅडोजऐवजी पावडर आयशॅडोज आणि ब्लश वापरावेत.
या चुका करू नका
उन्हाळ्यात क्रीमी जास्त हेवी आणि ग्लॉसी मेकअप करणे टाळा. कारण उष्णतेमुळे हा मेकअप लवकर निघून जातो. त्यातच हेवी फाउंडेशन लावल्याने चेहऱ्यावर पॅचेस दिसू शकतात. शिवाय क्रीम बेस्ड मेकअप टाळा. कारण उष्ण वातावरणामुळे मेकअप पसरू शकतो. तसेच जास्त प्रमाणात हायलाइटर लावणे टाळा. त्याऐवजी उन्हाळ्यात तुम्ही नॅच्युरल लूकला प्राधान्य द्या. कमीत कमी मेकअप प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करा.
मेकअप करण्याआधी त्वचा तयार करा
मेकअप करण्यापूर्वी त्वचेला तयार करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून मेकअप बेस व्यवस्थित सेट होईल आणि जास्त वेळ टिकेल. यासाठी कापसाच्या मदतीने क्लिन्झर घेऊन चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर प्रायमर आणि मग मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर, SPF 30 किंवा 50+ असलेले सनस्क्रीन लावा. फक्त लक्षात ठेवा की या हंगामात वॉटर-बेस्ड किंवा जेल-बेस्ड सनस्क्रीन वापरावे. यामुळे त्वचेवरील तेलकटपणा टळतो आणि चेहऱ्याला मॅट फिनिश मिळतो.
बेस हलका ठेवा
तुम्ही जर तुमच्या रोजच्या वापरासाठी विशेषतः दिवसा मेकअप करत असाल, तर फाउंडेशन लावणे टाळा. हलक्या बेसमुळे तुमचा चेहरा अधिक तरुण आणि ताजातवाना दिसेल. यासाठी बीबी किंवा सीसी क्रीमचा वापर करा. जर तुम्हाला फाउंडेशन लावायचेच असेल, तर ते चांगले कव्हरेज देणारे आणि मॅट फिनिश देणारे असावे. ब्युटी ब्लेंडरऐवजी ब्रशने फाउंडेशन लावल्यास अधिक गुळगुळीत फिनिश मिळेल.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)