Skin Care : ‘हे’ फेशियल आठवड्यातून एकदा त्वचेवर लावा आणि कोरियन मुलींसारखी चमकदार त्वचा मिळवा!

कोरियन मुलींचे नैसर्गिक सौंदर्य प्रत्येक मुलीला आकर्षित करते. कोरियन मुलींची त्वचा चमकदार आणि मऊ असते. कोरियन मुलींसारखी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण बाजारातील उत्पादने वापरतात. मात्र, काहीही फरक पडत नाही. आपल्याला खरोखरच कोरियन मुलींसारखी त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय नक्की केले पाहिजेत.

Skin Care : हे फेशियल आठवड्यातून एकदा त्वचेवर लावा आणि कोरियन मुलींसारखी चमकदार त्वचा मिळवा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 8:05 AM

मुंबई : कोरियन मुलींचे नैसर्गिक सौंदर्य प्रत्येक मुलीला आकर्षित करते. कोरियन मुलींची त्वचा चमकदार आणि मऊ असते. कोरियन मुलींसारखी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण बाजारातील उत्पादने वापरतात. मात्र, काहीही फरक पडत नाही. आपल्याला खरोखरच कोरियन मुलींसारखी त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय नक्की केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. (Apply this facial on the skin once a week to get glowing skin)

या गोष्टींसह घरी फेशियल तयार करा

साहित्य: दही, साखर, एक चमचा बदाम तेल, एक चमचा मेथी पावडर, कोरफड जेल आणि गुलाब पाणी लागणार आहे.

फेशियल कसे तयार करायचे हे जाणून घ्या

1 स्टेप

सर्वप्रथम, दही घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हातांनी सुमारे 5 मिनिटे मालिश करा. हे तुमच्या त्वचेसाठी क्लीन्झर म्हणून काम करेल आणि त्वचेतील घाण काढून टाकेल. यानंतर कोमट पाण्यात कापड भिजवून चेहरा स्वच्छ करा.

स्टेप 2

साखर बारीक वाटून घ्या. यानंतर त्यामध्ये एक चमचा दही मिक्स करा. सुमारे 5 मिनिटे हलक्या हातांनी चेहरा घासून घ्या. यानंतर, ओल्या झालेल्या स्वच्छ कापडाने त्वचा पुसून टाका. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाईल आणि छिद्र स्वच्छ होतील.

स्टेप 3

आता पुन्हा एका भांड्यात एक चमचा दही घाला. एक चमचा बदामाचे तेल, मेथी पावडर आणि थोडे गुलाबपाणी घालून मिक्स करा. आता हा पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे सोडा. यानंतर चेहऱ्याचा चांगला मसाज करा आणि पॅक कोमट पाण्याने धुवा.

स्टेप 4

कोरफड जेल आणि गुलाबपाणी मिसळा आणि हातांवर घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे चेहऱ्याची मालिश करा. दहा मिनिटांसाठी हे आपल्या चेहऱ्यावर तसेच ठेवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this facial on the skin once a week to get glowing skin)