Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ खास फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा सविस्तर!

| Updated on: Nov 05, 2021 | 11:19 AM

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्वचेची काळजी घेतली नाहीतर आपली त्वचा खराब होण्यास सुरूवात होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. लिंबू हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी हे खास फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा सविस्तर!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्वचेची काळजी घेतली नाहीतर आपली त्वचा खराब होण्यास सुरूवात होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. लिंबू हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण लिंबाचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्या सात ते आठ चमचे लिंबाचा रस, गुलाब पाणी आणि मुलतानी माती लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट साधारण वीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होईल.

त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आणि त्वचा तजेलदार करण्यासाठी आपण लिंबू आणि बेसन पीठाचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. या फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि चार चमचे लिंबाचा रस घ्या. त्यानंतर याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. हा पॅक आपण आठ दिवसातून दोनदा आपल्या चेहऱ्याला लावा.

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा फेसपॅक वापरू शकता. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि चार चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर लागेल. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

(Apply this special face pack on the face to get beautiful skin)