Hair Care : पावसाळ्याच्या हंगामात ‘या’ चुका करणे टाळा अन्यथा होऊ शकतात केस खराब! 

| Updated on: Sep 23, 2021 | 7:39 AM

या हंगामात केसांना मॉइस्चराइज ठेवणे फार महत्वाचे आहे. आपले केस चमकदार आणि स्टायलिश ठेवण्यासाठी आपण अनेकदा चुका करतो. या चुकांमुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. यासोबतच केसांची समस्याही वाढते. पावसाळ्यात कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊया.

Hair Care : पावसाळ्याच्या हंगामात या चुका करणे टाळा अन्यथा होऊ शकतात केस खराब! 
केसांची काळजी
Follow us on

मुंबई : लांब आणि चमकदार केस मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. पण व्यस्त जीवनशैलीमुळे आणि योग्य काळजी न घेतल्याने, केस गळणे, तुटणे या समस्यांमधून जावे लागते. विशेषत: पावसाळ्यात ओलाव्यामुळे केसांची काळजी घेणे कठीण होते. (Avoid making these mistakes during the rainy season, as hair can get damaged)

या हंगामात केसांना मॉइस्चराइज ठेवणे फार महत्वाचे आहे. आपले केस चमकदार आणि स्टायलिश ठेवण्यासाठी आपण अनेकदा चुका करतो. या चुकांमुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. यासोबतच केसांची समस्याही वाढते. पावसाळ्यात कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊया.

हीट स्टाइलिंग प्रोडक्ट्सचा अति वापर

हीट स्टाइलिंग प्रोडक्ट्सचा वापर केल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात. केसांची हीट स्टाइलिंग केल्याने केस खूप कोरडे आणि निर्जीव दिसतात. मात्र, पावसाळ्यात जास्त ओलावा असल्याने केसांना अधिक नुकसान होते.

जीवनशैलीमध्ये बदल

हवामान बदलत असताना आपण आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करतो. त्याचप्रमाणे, त्वचेची काळजी आणि केसांच्या दिनक्रमातही बदल करणे आवश्यक आहे. पावसाळा आणि आर्द्रता लक्षात घेऊन आपण त्या उत्पादनांचा वापर केला पाहिजे जे हलके होण्याबरोबरच त्वचेला मॉइश्चराइझ ठेवतात. कारण पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते.

तेलाचा जास्त वापर

आपल्या सर्वांना माहित आहे की केसांना तेल लावल्याने आवश्यक पोषक घटक मिळतात. नियमितपणे तेल लावल्याने केस जाड आणि निरोगी दिसतात यात शंका नाही. परंतु कधीकधी जास्त प्रमाणात तेल लावल्याने नकारात्मक परिणाम होतो. या हंगामात जास्त तेल लावल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि पटकन तुटतात. केसांची रात्रभर तेल ठेवू नये याची विशेष काळजी घ्या.

केस न धुणे

पावसाचे पाणी केसांसाठी अम्लीय असल्याने ते हानिकारक ठरू शकते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जर तुमचे केस पावसात ओले झाले असतील तर ते नंतर धुवा. असे केल्याने केसांची समस्या कमी होऊ शकते.

मॉइश्चराइझ

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्याचे अनेक मार्ग आहेत. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की कंडिशनर आणि मास्क न लावल्याने काही फरक पडत नाही. पण या दोन्ही गोष्टी केसांना मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. शॅम्पूने केस धुल्यानंतर नेहमी सीरम लावा. यामुळे केसांना पोषण मिळेल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Avoid making these mistakes during the rainy season, as hair can get damaged)