AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : दुधी भोपळा आरोग्यासाठीच नव्हेतर त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर, वाचा फायदे!

दुधी भोपळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण बऱ्याच वेळा दुधी भोपळ्याची भाजी देखील खाल्ली असेल. पण तुम्हाला हे माहीती आहे का? की, दुधी भोपळा फक्त आरोग्यासाठी नव्हेतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि अँटिऑक्सिडंट्स असते.

Beauty Tips : दुधी भोपळा आरोग्यासाठीच नव्हेतर त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर, वाचा फायदे!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई : दुधी भोपळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण बऱ्याच वेळा दुधी भोपळ्याची भाजी देखील खाल्ली असेल. पण तुम्हाला हे माहीती आहे का? की, दुधी भोपळा फक्त आरोग्यासाठी नव्हेतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि अँटिऑक्सिडंट्स असते. दुधी भोपळा त्वचेला ओलावा देतो आणि मृत पेशी काढून त्वचा चमकदार बनवतो. (Calabash’s face pack is extremely beneficial for the skin)

तेलकट त्वचेसाठी

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दुधी भोपळ्याचा फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी भोपळ्याचे काही तुकडे घ्या. यानंतर, त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाब पाणी मिसळा. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. सुमारे 15 मिनिटांनी कोमट पाण्याने तोंड धुवा. हा फेसपॅक लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाची समस्या दूर होते.

कोरड्या त्वचेसाठी

दुधी भोपळा चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्याबरोबरच मृत पेशी काढून टाकतो आणि चेहऱ्यावर चमक आणतो. ज्या लोकांना कोरड्या त्वचेची समस्या आहे त्यांच्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर आहे. यासाठी दुधी भोपळ्याचा गर दोन चमचे घ्या. त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा गुलाबपाणी मिक्स करा. चांगली पेस्ट तयार करून आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

पुरळची समस्या

जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर तर तुम्ही पपई आणि भोपळ्याचा फेसपॅक वापरू शकता. हा पॅक बनवण्यासाठी दुधी भोपळ्याची पेस्ट दोन चमचे आणि पपईची पेस्ट दोन चमचे घ्या. त्यानंतर ही पेस्ट चांगली मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. पेस्ट कोरडी होईपर्यंत चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठ दिवसातून तीन वेळा लावली पाहिजे. ज्यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Calabash’s face pack is extremely beneficial for the skin)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.