AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makhana Health Benefits : दररोज मूठभर मखाणा खा आणि निरोगी आयुष्य जगा!

वजन कमी करण्यासाठी आजकाल आहारात मखाणाचा समावेश केला जातो, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे एक हेल्दी स्नॅक्स आहे, ज्यात कमी उष्मांक आहे आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील तो मदत करतो.

Makhana Health Benefits : दररोज मूठभर मखाणा खा आणि निरोगी आयुष्य जगा!
मखाणा
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 1:07 PM
Share

मुंबई : मखाणा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मखाणा हा पारंपारिक भारतीय नाश्ता आहे. हे आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायामिन, प्रथिने आणि फॉस्फरस आहे. थोडेसा भाजलेले मखाणा हा चहासोबत उत्तम आरोग्यदायी नाश्ता आहे. (Makhana is extremely beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी आजकाल आहारात मखाणाचा समावेश केला जातो, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे एक हेल्दी स्नॅक्स आहे, ज्यात कमी उष्मांक आहे आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील तो मदत करतो.

किडनीसाठी फायदेशीर

मखाणा रक्त प्रवाह नियंत्रित करून निरोगी मूत्रपिंड राखण्यास मदत करतो. ते प्लीहा डिटॉक्सिफाई करतात. हे शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आपण दररोजच्या आहारामध्ये मखाण्याचा समावेश केला पाहिजे.

निरोगी हृदय

मखाण्यामध्ये मॅग्नेशियम, प्रथिने, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या महत्वाच्या गोष्टी असतात. मखाणामध्ये सोडियम आणि चरबी कमी करण्यास मदत करते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

लिव्हर

आपले लिव्हर आपल्या शरीरातील सर्व घाण काढून टाकते. मखाणामुळे लिव्हरला योग्यरित्या कार्य करण्यास आणि चयापचय वाढण्यास मदत होते.

हाडे मजबूत बनतात 

मखाण्यात भरपूर कॅल्शियम आणि खनिजे असतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. आपण दररोज मखाणाला आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. यामुळे ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

मखाणा रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मखाणामध्ये कमी कॅलरी आणि ग्लायसेमिक इंडेक्स असते. जे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास मदत करते

मखाणामध्ये कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हार्मोनल संतुलन

मखाणा आपल्या शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. मासिक पाळी दरम्यान हे अति खाणे टाळण्यास मदत करतात. मासिक पाळीमधील त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये मखाणा समावेश करा.

पाचन तंत्र निरोगी ठेवते

आपल्या शरीराला योग्य पचनासाठी फायबरची गरज असते. मखाणामध्ये भरपूर फायबर असते, जे पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करते. ते बद्धकोष्ठता आणि पचन संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. आपण मखाणाचा आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करू शकता.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग राहतील दूर मखाणा रक्तदाब नियंत्रित करतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहते. हा एक निरोगी नाश्ता आहे, जो हृदयाशी संबंधित आजारांना दूर ठेवतो.

त्वचेसाठी फायदेशीर

मखाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड भरपूर असते. जे अकाली वृद्धत्व टाळते. मखान्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Makhana is extremely beneficial for health)

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं