Brown Rice Benefits : त्वचा आणि केसांसाठी ब्राउन राइस अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Aug 08, 2021 | 12:04 PM

तांदूळ केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. पांढरे आणि ब्राउन दोन्ही तांदूळांसह विविध प्रकारचे डिश तयार केले जातात. आपण केस आणि त्वचेसाठी ब्राउन राइस अत्यंत फायदेशीर आहे.

Brown Rice Benefits : त्वचा आणि केसांसाठी ब्राउन राइस अत्यंत फायदेशीर!
ब्राउन राइस
Follow us on

मुंबई : तांदूळ केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. पांढरे आणि ब्राउन दोन्ही तांदूळांसह विविध प्रकारचे डिश तयार केले जातात. आपल्या केस आणि त्वचेसाठी ब्राउन राइस अत्यंत फायदेशीर आहे. ब्राउन राइसच्या मदतीने अनेक प्रकारचे फेसपॅक तयार करून आपण सुंदर आणि चमकदार त्वचा मिळू शकतो. (Brown Rice is beneficial for skin and hair)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ब्राउन राइस – यासाठी तुम्हाला 1/2 कप ब्राउन राइस आणि 1 कप पाणी लागेल. ब्राउन राईस स्वच्छ भांड्यात ठेवा आणि झाकून ठेवा. सुमारे 15 मिनिटे भिजवू द्या, जोपर्यंत पोषक घटक पाण्यात शिरत नाहीत तोपर्यंत ब्राउन राइस पाण्यात रादूद्या. त्यानंतर याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यासह मानेवर देखील लावा. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.

चमकदार त्वचेसाठी – ब्राउन राइसध्ये असलेले सेलेनियम त्वचेची लवचिकता राखण्यास आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते. चमकदार त्वचेसाठी ब्राउन राइस आणि दही आवश्यक असेल. हा फेस मास्क बनवण्यासाठी आधी ब्राउन राइस बारीक वाटून घ्या. अर्धा चमचा ब्राउन राइसमध्ये एक चमचा दही मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.10 मिनिटे सोडा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.

मुरुमांवर उपचार करते – यासाठी तुम्हाला 2 चमचे ब्राउन राइस लागेल. आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. कापसाचा गोळा तांदळाच्या पाण्यात बुडवून थेट मुरूमावर लावा. ते कोरडे होऊ द्या. यास सुमारे 10 ते 15 मिनिटे लागतील. कोमट पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून तीन दिवस हा प्रयोग करू शकता.

केसांसाठी फायदेशीर – केस निरोगी ठेवण्यासाठी ब्राउन राइस चांगला फायदेशीर मानला जातो. त्यात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, फोलासिन, पोटॅशियम आणि फायबर असतात. हे सर्व घटक निरोगी केसांसाठी आवश्यक आहेत. ब्राउन राइस या सर्व पोषक तत्वांनी समृद्ध असतो. तांदळातील विविध पोषक तत्त्वांमुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Brown Rice is beneficial for skin and hair)