Skin care : नारळाचे पाणी त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Jun 20, 2021 | 10:07 AM

सध्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात कोरडेपणा, लालसरपणा आणि खाज सुटण्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे या हंगामात त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागते.

Skin care : नारळाचे पाणी त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
नारळ पाणी
Follow us on

मुंबई : सध्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात कोरडेपणा, लालसरपणा आणि खाज सुटण्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे या हंगामात त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागते. नारळ पाण्याचा उपयोग करून आपण त्वचेला हायड्रेट ठेऊ शकतो. यासह, त्वचेच्या समस्यांपासून देखील मुक्त होऊ शकतो. नारळ पाणी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. (Coconut water is extremely beneficial for the skin)

नारळ पाणी फेस टोनर

नारळ पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आपण फेस टोनर म्हणून नारळाचे पाणी वापरू शकता. यासाठी प्रथम कढईत थोडेसे पाणी उकळवा आणि त्यात ग्रीन टी घाला. सुमारे दोन मिनिटे मंद आचेवर शिजवा. यानंतर, ग्रीन टी गाळून घ्या आणि पाणी थंड होऊ द्या. पाणी चांगले थंड झाल्यावर त्यात 2 चमचे गुलाब पाणी आणि 3 चमचे नारळ पाणी घाला. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा आणि चेहरा साफ केल्यानंतर दररोज सकाळी टोनर म्हणून वापरा.

नारळ पाण्याचा फेसपॅक

नारळाच्या पाण्याचा फेसपॅक करण्यासाठी एक चमचा चंदन पावडर घाला आणि त्यात एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा नारळाचे पाणी घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आपण आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरू शकता.

नारळाच्या पाण्याचा फेसवॉश

नारळाच्या पाण्याचा फेसवॉश करण्यासाठी एका भांड्यात एक चमचे मध, 1 चमचे नारळाचे पाणी आणि 1 चमचे केमिकल फ्री फेसवॉश मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होईल.

मुरुमांशी लढण्यास मदत करते

नारळाच्या पाण्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे मुरुमांशी लढण्यास मदत करतात. ते त्वचेवरील मुरुमांच्या डागांपासून मुक्त होण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी मदत करतात. हे स्वतःहून आपले कार्य करणार नाही, नारळपाणी हे आपल्या नियमित स्किनकेअर रुटीनमध्ये एक चांगली भर आहे.

मॉईश्चराईज

नारळ पाण्यामध्ये अमीनो अॅसिड देखील असते जे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी खूप चांगले असते. नारळपाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्याने सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यास देखील हे मदत करते.

संबंधित बातम्या : 

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

(Coconut water is extremely beneficial for the skin)