आरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय; जाणून घ्या एक्सफोलिएटरचा वापर

| Updated on: Jul 24, 2021 | 8:04 AM

एक्सफोलिएशन किंवा स्क्रबिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरील छिद्रे दूर होतात. जर तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करू शकता.

आरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय; जाणून घ्या एक्सफोलिएटरचा वापर
आरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय
Follow us on

मुंबई : त्वचेला चमक मिळवून देण्यासाठी ‘स्किन एक्सफोलिएशन’ खूप महत्वाचे आहे. ही आपल्या त्वचेच्या वरच्या थरातून मृत पेशी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. यामुळे आपली त्वचा निरोगी राहते. हे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी करते. ही प्रक्रिया त्वचेवरील मृत पेशी आणि चेहऱ्यावर जमा झालेली घाण काढून टाकण्यास मदत करते. तुम्ही हे नियमितपणे करू शकता. एक्सफोलिएशन किंवा स्क्रबिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरील छिद्रे दूर होतात. जर तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करू शकता. तुम्हाला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएटदेखील करता येईल. मध, साखर, दही, कॉफी ही काही चांगली नैसर्गिक त्वचा एक्सफोलीएटर आहेत. (Do this natural remedy for healthy skin; know how to use an exfoliator)

साखरेचा उपयोग करा

समान प्रमाणात साखर आणि कोरफडचे मिश्रण करा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच गळ्यावर लावा. नंतर त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी गोलाकार हालचालींमध्ये हळूवारपणे मालिश करा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा या नैसर्गिक एक्सफोलिएटरचा प्रयोग करू शकता.

स्ट्रॉबेरीचा वापरदेखील ठरेल फायदेशीर

4 ते 5 ताजे स्ट्रॉबेरी घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. मॅश करून त्याची पेस्ट बनवा. स्क्रब तयार करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचे तुकडेदेखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तसेच मानेवर मॅश केलेल्या स्ट्रॉबेरी लावा आणि बोटाने हळूवारपणे मालिश करा. हे मिश्रण पुढील 5 मिनिटे त्वचेवर ठेवा आणि नंतर ताज्या पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा स्ट्रॉबेरीचा नैसर्गिक त्वचा एक्सफोलीएटर म्हणून वापर करू शकता. त्वचेला चमक मिळवून देण्यासाठी हाही एक सर्वोत्तम उपाय आहे.

दहीचा वापर करा

एक चमचा ताजे दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध घाला. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी या मिश्रणाने चेहरा आणि मानेवर मालिश करा. अशा पद्धतीने काही मिनिटे मालिश करा. तुम्ही दहीदेखील आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नैसर्गिक एक्सफोलिएटरच्या रुपात वापर करू शकता.

तांदळाचे पीठ वापरा

तांदळाच्या पीठाचा नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून वापर करतान तुम्हाला दूध आणि तांदळाचे पीठ घ्यावे लागेल. एका भांड्यात एक मोठा चमचाभर तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडेसे दूध घालून पेस्ट बनवा. हे नैसर्गिक त्वचा एक्सफोलीएटर संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. नंतर काही मिनिटांसाठी आपल्या बोटाने हळूवारपणे मालिश करा. त्यानंतर ताज्या थंड पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशाप्रकारे प्रयोग करू शकता. (Do this natural remedy for healthy skin; know how to use an exfoliator)

इतर बातम्या

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागली, किंमतीत 662 रुपयांची उसळी

Chiplun Flood : पूरग्रस्त भागातील मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा