Health Tips : ऑईल पुलिंग म्हणजे काय? ते शरीरासाठी कसे फायदेशीर आहे, ते जाणून घ्या!

आपली वाईट जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करते. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांचे सतत सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.

Health Tips : ऑईल पुलिंग म्हणजे काय? ते शरीरासाठी कसे फायदेशीर आहे, ते जाणून घ्या!
आॅईल पुलिंग
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 10:41 AM

मुंबई : आपली वाईट जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करते. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांचे सतत सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक आणि हर्बल पद्धतींचा अवलंब करू शकता. अशीच एक पद्धत म्हणजे ऑईल पुलिंग आहे. (Extremely beneficial for oil pulling health)

आजकाल आपल्या जीवनशैलीत ऑईल पुलिंग स्वीकारले जात आहे. ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑईल पुलिंग म्हणजे काय आणि शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर कसा करू शकतो ते जाणून घेऊया. ऑईल पुलिंग ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. ज्यात शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी विविध प्रकारचे तेल वापरले जाते.

यामध्ये तिळाचे तेल, सूर्यफूल तेल आणि नारळाचे तेल वापरले जाते. ही सर्व तेले मिसळून तोंड धुवून नंतर ब्रश केला जातो. यासाठी तुम्हाला सकाळी नाश्त्याच्या 20 ते 25 मिनिटे आधी हे करावे लागेल. लक्षात ठेवा की, ऑईल पुलिंगच्या वेळी तेल गिळू नका. काही काळ तोंडात तेल हलवा आणि नंतर स्वच्छ धुवा. त्या ब्रश नंतर करा.

ऑईल पुलिंगचे फायदे

ऑईल पुलिंगसाठी सर्वोत्तम वेळ सकाळी मानली जाते. आयुर्वेदात देखील सकाळी रिकाम्या ऑईल पुलिंग योग्य वेळ सांगितली गेली आहे. हा उपाय केल्याने तोंडात असलेले जीवाणू आणि जंतू चांगले स्वच्छ होतात. नियमितपणे वापरल्यास, ते तोंडाची दुर्गंधी, पोकळीची समस्या, हिरड्या सुजणे, दातदुखी, डोकेदुखी आणि त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते.

ऑईल पुलिंगच्या वेळी ही खबरदारी घ्या

ऑईल पुलिंगच्या वेळी चुकूनही तेल गिळू नका. कारण त्यात भरपूर बॅक्टेरिया असतात जे शरीराला हानी पोहोचवू शकतात. नेहमी शुद्ध तेल वापरा. लहान मुलांनी ऑईल पुलिंग करणे टाळले पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तेलाची अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Extremely beneficial for oil pulling health)