मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Jul 23, 2021 | 7:38 AM

सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपण आठ दिवसातून दोन वेळा मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक वापरला पाहिजे

मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक हा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपण आठ दिवसातून दोन वेळा मध, बदाम आणि नारळाच्या दुधाचा फेसपॅक वापरला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे हा पॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागणार नाही. अत्यंत कमी वेळेत हा पॅक आपण घरच्या-घरी तयार करू शकतो. हा फेसपॅक घरी नेमका कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत.
(Face pack of honey, almond and coconut milk is beneficial for the skin)

सहा बदाम घ्या आणि त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा. दुसर्‍या दिवशी त्यांची बारीक करून पेस्ट तयार करा. एक चमचा बदाम पेस्ट घ्या आणि त्यात एक चमचा नारळाचे दूध आणि मध घाला. नारळाच्या दुधाचा हा फेसपॅक चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे आपल्या बोटाने त्वचेवर मालिश करा आणि नंतर ते 20 मिनिटांसाठी त्वचेवर ठेवा. यानंतर साध्या पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा नारळाच्या या दुधाचा फेसपॅक वापरा.

हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एका वाटीत चांगला मिक्स करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 ते 25 मिनिटे हे आपल्या चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास देखील मदत होईल.

बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांसाठी बदाम तेलही वापरता येते. बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Face pack of honey, almond and coconut milk is beneficial for the skin)