AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

सणांचे दिवसात प्रत्येकाला वेगळा लूक हवा असतो. सर्वांनी आपले कौतुक करावे असे कोणाला वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीने सजत असतो. पण सैदर्यशास्त्रानुसार आपला संपूर्ण लूक आपल्या केसांवर अवलंबून असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही हेअरस्टाईल घेऊन आलो आहोत.

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल
hair
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 9:05 AM
Share

मुंबई : सणांचे दिवसात प्रत्येकाला वेगळा लूक हवा असतो. सर्वांनी आपले कौतुक करावे असे कोणाला वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीने सजत असतो. पण सैदर्यशास्त्रानुसार आपला संपूर्ण लूक आपल्या केसांवर अवलंबून असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही हेअरस्टाईल घेऊन आलो आहोत. तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही केसांची रचना निवडू शकता. तुमची केसरचना तुम्हाला एक वेगळा लूक देईल . चला तर मग जाणून घेऊयात सणांच्या दिवसात तुम्ही तुमची हेअरस्टाईल कशी कराल.

लहान केसांसाठी

लहान केसांसाठी ही एक साधी ट्विस्ट केशरचना आहे. हे करण्यासाठी, पार्टिंगला दोन्ही बाजूंनी केसांचा 3-इंच भाग घ्यावा लागेल आणि नंतर त्या केसांना पिळ द्या. यामुळे तुमच्या केसांना नवा लुक आणि स्टाइल मिळेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यासोबत फुलेही लावू शकता. त्यासाठी ब्लो ड्रायचा वापर तुम्ही करु शकता. तुम्ही केसांना ब्रॉच किंवा ताजी फुलांचा देखील वापर करु शकता.

मध्यम लांबीच्या केसांसाठी

जर तुम्हाला तुमच्या केसांची लांबी लपवायची नसेल, तर आजकाल स्लीक आणि क्लासिक बन ट्रेंडमध्ये आहे. हे करण्यासाठी, तुमचे सर्व केस अंबाड्याच्या आत व्यवस्थित बांधलेले जातात, कॅज्युअल लूकसाठी, समोरून केसांच्या काही बटा तुम्ही काढू शकता. यामुळे तुम्हाला सिम्पल पण सुंदर लूक मिळेल.

लांब केसांसाठी

तुमचे केस लांब असल्यास, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या हेअरस्टाईल वापरून पाहू शकता. लांब केस तुम्ही मोकळे देखील ठेऊ शकता किंवा त्यांचा अंबाडा देखील बांधू शकता. केस मोकळे सोडून तुम्हाला त्रास होत असेल किंवा काम करता येत नसेल तर तुम्ही केस क्लिपने सुद्धा बांधू शकता. जर तुम्ही सिम्पल लूक ठेवणार असाल तर समोरील केस कुरळे करायला विसरु नका.

इतर बातम्या :

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Stale food Side Effects: जाणून घ्या शिळे अन्न खाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो…

Immunity Booster : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा आहारात समावेश करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.