Stale food Side Effects: जाणून घ्या शिळे अन्न खाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो…

घरामध्ये सर्वांचे जेवन झाल्यानंतर उरलेले अन्न शक्यतो आपण फेकून देणे टाळतो. उरलेले अन्न फेकणे बहुतेक लोकांना आवडत नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या घरात रात्रीच्या जेवणातले काहीना काहीतरी उरलेले असते. जे फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि सकाळी तेच रात्रीचे जेवण गरम करून खाल्ले जाते.

Stale food Side Effects: जाणून घ्या शिळे अन्न खाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो...
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 8:06 AM

मुंबई : घरामध्ये सर्वांचे जेवन झाल्यानंतर उरलेले अन्न शक्यतो आपण फेकून देणे टाळतो. उरलेले अन्न फेकणे बहुतेक लोकांना आवडत नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या घरात रात्रीच्या जेवणातले काहीना काहीतरी उरलेले असते. जे फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि सकाळी तेच रात्रीचे जेवण गरम करून खाल्ले जाते. हे जवळजवळ प्रत्येक घरात घडते. रात्री उरलेल्या अन्नाला आपण शिळे अन्न म्हणतो.

उरलेले अन्न जास्त दिवस ठेवले तर ते शिळे होते, पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की उरलेलं शिळे अन्न खावं का… की किती दिवस ठेवल्यावर ते शिळं होतं? किंवा शिळे अन्न आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शिळ्या अन्नाबाबत आयुर्वेदाचा सल्ला

आयुर्वेदानुसार, 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न कधीही खाऊ नये. कारण 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्याला आयुर्वेद योग्य मानत नाही.

इतकंच नाही तर एकदा अन्न शिजवलं की त्यात ओलावा असतो आणि बनवल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यात बॅक्टेरिया होतो. ज्यामुळे अनेक आजार होतात. म्हणजेच शिळे अन्नही तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

आजकाल अशी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात, जी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यानंतर उरलेले अन्न खातात. जे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. मायक्रोवेव्हमध्ये अन्न पुन्हा गरम केल्याने जीवनसत्त्वांसारखे आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. अनेक वेळा असे केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचीही शक्यता असते.

हेही महत्वाचे

सगळ्याच प्रकारचे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषत: अंडी, तांदूळ, सीफूड, चिकन आणि प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ शिळे खाणे टाळावे. या सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरिया पटकन वाढतात. म्हणून, या गोष्टी बर्‍याच दिवसांनंतर खाऊ नयेत. जर अन्न विषबाधा वाढली, तर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास देखील वाढतो.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Eating stale food is dangerous to health)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.