
चेहरा सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी चांगला हेअरकट करणे खूप महत्वाचे आहे. पण प्रत्येक हेअरकट तुमच्या चेहऱ्याला शोभेलच असे काही नाही. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगळा असतो. बऱ्याच वेळा मुली इतरांना पाहून तसाच हेअरकट करतात. मात्र, ते त्यांच्या चेहऱ्याला शोभत नाही.

खूप लांब केस किंवा खूप लहान केस गोल चेहऱ्यावर चांगले दिसत नाहीत. यामुळे चेहरा जाड दिसू शकतो. लाँग बॉब कट, क्वीन हेअरकट, बॉब ग्रॅज्युएशन हेअरकट आणि स्टेप हेअरकटपैकी कोणताही कट गोल केसांवर चांगला दिसतो.

जर तुमचा चेहरा अंडाकृती आकाराचा आहे. ज्याला आपण सामान्य भाषेत ओव्हल म्हणतो. अंडाकृती चेहऱ्यासाठी पॉइंटी लेयर्स हेअरकट, मल्टी लेयर हेअरकट आणि लाँग लेयर हेअरकट चांगले दिसतात.

बहुतेक लोकांचा चेहरा गोल किंवा अंडाकृती असतो. जर तुमचाही चेहरा असाच असेल तर तुम्हाला बॉब क्लासिक हेअरकट, लाँग बॉब हेअर कट, फुल फ्रिंज हेअरकट आणि पिक्सी हेअरकट चेहऱ्याला सूट करतो.

जर तुमचा चेहरा उभा असेल तर तुम्हाला कुरळे केस चांगले दिसतील. कुरळ्या केसांसाठी लेयर हेअरकट चांगला आहे.