आयुर्वेदानुसार त्वचा आणि केसांची अशा प्रकारे काळजी घ्या आणि समस्या दूर करा!

| Updated on: Mar 29, 2022 | 11:49 AM

गोदरच्या काळात त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी केवळ आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब केला जात असे. मात्र, आता आपण केसांसाठी आणि त्वचेसाठी अनेक प्रकारचे कॉस्मेटिक वापरतो. पूर्वीच्या या आयुर्वेदिक स्किनकेअर (Skin care) टिप्समुळे आजही त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवता येते. असे म्हटले जाते की पूर्वी लोक अन्नामध्ये आयुर्वेदाची मदत घेत असत. कारण त्वचेसाठी आरोग्यदायी आहार खूप जास्त फायदेशीर आहे.

आयुर्वेदानुसार त्वचा आणि केसांची अशा प्रकारे काळजी घ्या आणि समस्या दूर करा!
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अगोदरच्या काळात त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी केवळ आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब केला जात असे. मात्र, आता आपण केसांसाठी आणि त्वचेसाठी अनेक प्रकारचे कॉस्मेटिक वापरतो. पूर्वीच्या या आयुर्वेदिक स्किनकेअर (Skin care) टिप्समुळे आजही त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवता येते. असे म्हटले जाते की पूर्वी लोक अन्नामध्ये आयुर्वेदाची मदत घेत असत. कारण त्वचेसाठी आरोग्यदायी आहार खूप जास्त फायदेशीर आहे. आजच्या काळात जरी केमिकलयुक्त (Chemical) पदार्थांचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, आयुर्वेदिक आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला त्या आयुर्वेदिक टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब तुम्ही उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवू शकता.

बेसन पीठ

जुन्या काळात साबण किंवा शॉवर जेल नव्हते. तेंव्हा लोक अंघोळीसाठी बेसन वापरत होते. त्वचेवर चमक आणण्यासाठी बेसन पीठ अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी आयुर्वेदातही बेसनचा उल्लेख आहे. बेसनाने आंघोळ केल्याने त्वचेवरील घाण निघून जाते आणि अतिरिक्त तेलही निघून जाते. विशेष म्हणजे बेसन त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून घेत नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात कोरडेपणाची समस्या उद्भवत नाही. आठवड्यातून किमान दोनदा बेसनाने आंघोळ करावी.

कच्चे दुध

आयुर्वेदानुसार त्वचेवर दुधाची मालिश करणे किंवा आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळणे फायदेशीर आहे. असे केल्याने त्वचेवर आर्द्रता टिकून राहून ती चमकू शकते. दुधाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केस आणि त्वचा या दोन्हींना प्रोटीन आणि कॅल्शियम देते. दुधाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेला चांगले पोषणही मिळते. यामुळे चांगली त्वचा हवी असेल तर कच्च्या दूधाने नेहमीच आंघोळ करण्याचा प्रयत्न करा.

केस स्वच्छ करण्यासाठी

केस स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अनेक हर्बल पद्धती वापरून पाहू शकता. यापैकी एक म्हणजे मुलतानी मातीने केस स्वच्छ करणे. मुलतानी मातीचे वैशिष्ट्य म्हणजे ते केसांमधील ओलावा हिरावून घेत नाही आणि या कारणामुळे टाळूच्या कोरडेपणाची समस्या होत नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअर प्रोडक्ट्समध्ये असलेली केमिकल्स काही वेळा केस आणि टाळू कोरडी करू शकतात. म्हणूनच जे मुलतानी मातीने केस स्वच्छ करतात

दह्याचा मास्क

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दही हे आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर आहे. दह्यापासून बनवलेल्या हेअर मास्कचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही. केस सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी आपल्या केसांना नेहमीच दही लावा. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी देखील दही खूप फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Health Care : शरीरातील व्हिटामिन डी वाढवण्यासाठी या खास पेयांचा आहारात समावेश करा!

संधिवात म्हणजे नेमके काय, लक्षणे आणि उपचार कसे करायचे हे जाणून घ्या डाॅक्टरांकडूनच!