Hair Care | केस गळतात? ‘ही’ असू शकतात कारणं.. ‘या’ पदार्थाने गळू शकतात तुमचे केस!

बदलेली जीवनशैली, धकाधकीचं आयुष्य, जॅक फूड अती सेवन यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याचा समस्या निर्माण होतात. त्यात एक कॉमन समस्या म्हणजे केस गळती. आपण काय खातो यातूनही केस गळण्याची समस्या असू शकते. काही पदार्थांमुळे केस गळू शकतात.

Hair Care | केस गळतात? ‘ही’ असू शकतात कारणं.. ‘या’ पदार्थाने गळू शकतात तुमचे केस!
ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांच्यासाठी कढीपत्त्याचा मास्क रामबाण औषधापेक्षा कमी नाही. यासाठी कढीपत्ता बारीक करून ही पेस्ट टाळूला लावा. साधारण अर्धा तास असेच सोडल्यानंतर सामान्य पाण्याने डोके धुवा. खूप गरम पाण्याने केस धुतल्याने केसांच्या इतर समस्या निर्माण होऊ शकते. केसांना कोंडा मुक्त करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 5:29 PM

मुंबई : वाढलेले प्रदूषण आणि खराब जीवनशैली यामुळे केसांचं पोषष खराब होत चालल आहे. केसांची निगा राखणे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आहारात आपण काय खातो यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपल्या आहारातील काही पदार्थ आपल्या केस गळण्याचे कारण असू शकतं. बघूयात कुठले पदार्थ आहेत ते…

अती साखरेचं सेवन

अती साखरेचं सेवन हे आरोग्यासाठी घात आहे. जास्त गोड खाल्ल्यामुळे केसांवर परिणाम होऊ शकतो. अगदी तुम्हाला टक्कलही पडू शकतं. जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारातील साखरेचे प्रमाण कमी करा.

डाइट सोडा

लोकं फिटनेससाठी आजकाल डाइट सोडा प्यायला लागले आहेत. मात्र या डाइट सोडाचा जास्त सेवन केल्यामुळे तुमचे केस गळू शकतात. एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की डाइट सोडा बनविण्यासाठी एस्पार्टम नावाची कृत्रिम साखर मिसळली जाते जी तुमच्या केसांसाठी हानीकारक आहे.

दारु

केसांमधील केराटिन प्रथिनावर अल्कोहोल परिणाम करत असतं. त्यामुळे केस गळू लागतात. तसंच दारुमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात.

मासे

हो मासे खाल्ल्यामुळे आपल्याला केस गळतीची समस्या होऊ शकते. कारण बदलेल्या हवामानामुळे माशांमध्ये पारा वाढला असून तो जर आपल्या शरीरात गेला तर केस गळतीची समस्या आपल्याला होऊ शकते. त्यामुळे माशांचं सेवन जास्त प्रमाणात करु नका.

केसांची निगा राखा

  1. एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन तेल एकत्र करुन आठवड्यातून तीन वेळा तरी लावा.
  2. केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करु नका
  3. दही आणि अंड्याचं मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी लावा.
  4. रात्रभर भिजलेली काळ डाळची पेस्ट करा. यात अंड, लिंबाचा रस आणि दही टाकून मिश्रण तयार करा, हा मास्क केसांना लावा.
  5. कायम केस धुण्यापूर्वी तेलाने मसाज करा.

केस सुंदर निरोगी आणि केस गळतीपासून दूर राहण्यासाठी हे करा

  1. नियमित दही खाण्याची सवय लावा.
  2. केळ खाल्ल्यामुळे केसांचं सौंदर्य वाढतं.
  3. ओट्स खाल्ल्यामुळे केसांना पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.
  4. भिजवलेले बदाम हे केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे.

हेही वाचा :

christmas | ख्रिसमसनिमित्त घरच्या घरी बनवा चॉकलेट आणि बच्चेकंपनीला करा खूष

Relationship : वैवाहिक जीवनात तणाव वाढलाय? मग शुक्र ग्रहाला कसं करणार खुश? जाणून घ्या एका क्लिकवर…

Christmas 2021 | जगातील सर्वात जुने चर्च जिथे 6 जानेवारीला साजरा होतो ख्रिसमस! तुम्हाला माहितेय का याबद्दल?